नवीन घरकुल मंजूर यादी महाराष्ट्र 2023 | Gharkul Yadi 2023 Maharashtra

Gharkul Yadi 2023 List : 18 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाकडून 2023 ची नवीन घरकुल यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व संदर्भातील शासन निर्णयसुद्धा निर्मित करण्यात आलेला आहे. जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर व थोडक्यात माहिती. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ दिला जातो, तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्हीसुध्दा घरकुल योजनेचा लाभ मिळवू शकता.

घरकुल मंजूर यादी 2023 महाराष्ट्र

ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना शासनाकडून घर बांधण्यासाठी घरकुल मंजूर केलं जातं. म्हणजेच घरकुल बांधकामासाठी शासनाकडून काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येतो. विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल अनुदान मिळवण्यासाठी शासनाच्या निरनिराळ्या योजना कार्यरत आहेत. यापैकीच एक महत्त्वकांक्षी समजली जाणारी योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना होय.

या योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना घर बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात येते, शिवाय घर बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधीसुध्दा उपलब्ध करून दिला जातो. योजनेच्या काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्याअंतर्गत लाभार्थी पात्र असल्यास त्यांना क्षेत्रनिहाय घरकुल अनुदान दिलं जात.

नवीन घरकुल लिस्ट GR आला !

या लाभार्थ्यांना सदर योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनेचा लाभ मिळालेला असेल, त्यांची यादी आपण याठिकाणी पाहणार आहोत. या संदर्भातील शासन निर्णय (GR ) नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये राबविण्यात येते.

🏠 शबरी घरकुल योजनेचा शासन निर्णय आला ! आता सर्वांना हक्काचं घर

नांदेड जिल्ह्यातील 17 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली असून यासाठीचा निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेला असून शासन निर्णयास अनुसरून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे. घरकुलाची संपूर्ण यादी शासन निर्णयामध्ये जोडण्यात आलेली आहे.


📣 शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा !


यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभ मिळेल.

घरकुल यादी कशी पहावी ?

चालू वर्षातील मंजूर घरकुल यादी पाण्यासाठी वरती शासन निर्णय (जीआर) लिंक देण्यात आलेली आहे, त्यामध्ये तुम्ही यादी पाहू शकता.

Leave a Comment