Namo Shetkari Yojana Beneficiary List : नमो शेतकरी योजना महाराष्ट्र 2023 लिस्ट

Namo Shetkari Yojana Beneficiary List : शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी व शेतकऱ्यांच जीवनमान उंचावण्यासाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाकडून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. यांतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक सहाय्य म्हणून ट्रान्सफर करण्यात येते.

Namo Shetkari Yojana Beneficiary List

आता महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळू शकणार आहेत. यासाठी राज्य शासनाकडून नमो शेतकरी (किसान) महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणेच वार्षिक 6,000 रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एकंदरीत दरवर्षाला शासनाकडून 12,000 रुपये मिळतील.

नमो शेतकरी योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठीच सुरू करण्यात आलेली असल्यामुळे इतर राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. सदर योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना करण्यात आली, आता राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आलेली असून दीड कोटी शेतकऱ्यांना हफ्ता वितरित करण्यासाठी 6,900 कोटी रुपयांचा बजेट ठेवण्यात आला आहे.

Namo Shetkari Yojana Beneficiary Eligibility

नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाईल ? ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पूर्ववत लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. संदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला असून लवकरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.

पीएम किसान योजनेच्या शासनाकडून देण्यात आलेल्या चालू यादीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील अशी शक्यता आहे; परंतु शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अपडेट नुसार पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेले सर्व शेतकरी सदर योजनेसाठी पात्र असतील. नमो शेतकरी योजना लिस्ट किंवा यादी पाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता.

गावानुसार तुमचा यादीत नाव आहे का ? येथे क्लिक करून पहा

Namo Shetkari Yojana Beneficiary List

Leave a Comment