तुमच्या मोकळ्या जागेत किंवा छतावर मोबाईल कंपनीचा टावर लावण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या संबंधित टेलिकॉम कंपनीला संपर्क साधावा लागेल. सोबतच आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता टेलिकॉम कंपनीला विहित मुदतीत करावी लागेल.
आवश्यक कागदपत्रांची यादी
- स्टॅबिलिटी सर्टिफिकेट
- ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका नाहरकत प्रमाणपत्र
- जागेचा सातबारा उतारा
- कंपनीसोबतचा करारनामा
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- इतर आवश्यक कागदपत्र
पैसे किती मिळणार ?
तुम्ही जर ग्रामीण भागातील घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत टावर लावणार असाल, तर तुम्हाला 7000 रु. ते 50,000 रु. इतका मोबदला दिला जाऊ शकतो. याउलट तुम्ही जर शहरी भागातील घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेवर टावर लावणार असाल, तर तुम्हाला 50,000 ते 1.5 लाख इतका मोबदला संबंधित टेलिकॉम कंपनीकडून दिला जातो.
संपर्क कोणाशी साधावा ?
तुम्हाला टावर बसवण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ईमेलद्वारे किंवा फोनच्या माध्यमातून संपर्क साधावा लागेल. टावर कंपनीच्या संबंधित अधिकृत संकेतस्थळ लिंक खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत.
- Jio Partner Network
- ATC India Limited
- Indus Towers