Farmer Scheme : मंत्रिमंडळ निर्णय 18 ऑगस्ट 2023 : जोडरस्ता योजना, 100 रु. शिधा योजना इत्यादी

Farmer Scheme : मुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध क्षेत्रातील महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आले. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहुयात. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित असताना या विविध निर्णयावर चर्चा आणि निर्णय घेण्यात आले.

संक्षिप्त मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे

2) राज्यातील 17 जिल्ह्यातील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता शासनाकडून मुख्य रस्त्याला जोडण्यात येणार आहेत, यासाठी भगवान बिरसा मुंडा जोडरस्ता योजना शासनाकडून राबविण्यात येणार असून यासाठी 5 हजार कोटीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे.

2) दिवाळीत, गुढीपाडव्याला वाटप करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधाप्रमाणे आता गौरी गणपती आणि दिवाळीसाठी परत 100 रुपयात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चनाडाळ, साखर, खाद्यतेल इत्यादींचा समावेश असणार आहे.

3) आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आलेली आहे. आता दरमहा ५०० रुपये मिळणार.

4) मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी.

5) महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आलेला आहे.

6) केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला.

7) सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे.

8) दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन.

9) मंडणगड येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यात येणार.

📌 अधिक माहिती येथे क्लिक करून पाहा !

Leave a Comment