MahaDBT Scheme : महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी यादी प्रसिद्ध, 11 डिसेंबर 2023 सोडत यादी, यादीत तुमचं नाव आहे का ?

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामधीलच एक महत्त्वाचा विभाग किंवा घटक म्हणजे कृषी यांत्रिकीकरण होय. कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व विविध उपकरणाच्या अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येतो. या ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांमधून महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सोडत काढली जाते. कृषी यांत्रिकीकरण सोडत यादीमध्ये ट्रॅक्टर, पेरणीयंत्र, नांगर पावर टिलर, कडबा कटर इत्यादी आणि कृषी अवजारांचा समावेश आहे.

MahaDBT Lottery List – Dec 11

दिनांक ११ डिसेंबर 2023 रोजी कृषी यांत्रिकीकरणाची कृषी विभागाकडून सोडत यादी काढण्यात आलेली असून या सोडत यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड झालेली आहे, त्यांना महाडीबीटी पोर्टलवर 7/12, 8अ उतारा, बँक पासबुक व आधार कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रासह यंत्राचे कोटेशन, टेस्ट रिपोर्ट व इतर कागदपत्र अपलोड करावे लागतील.

संबंधित लाभार्थ्यांनी जर ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अर्ज केलेला असेल, तर त्या व्यक्तीच्या नावाने किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने असलेल्या ट्रॅक्टरचा आरसी बुकसुद्धा ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करावा लागेल. ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे, ट्रॅक्टर जर निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल, तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे.

दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजीची सोडत यादी पाहण्यासाठी खालील पर्यायावर क्लिक करा.

Leave a Comment