DBT Agriculture : ज्या शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी फार्मर पोर्टलअंतर्गत विविध योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला असेल, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनेची लॉटरी पद्धतीने सोडत होते, शेतकऱ्यांसाठीच्या महाडीबीटी पोर्टलवरून एकात्मिक फलोत्पादन, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बी-बियाणे, खत वाटप इत्यादीसाठी अनुसूचित जाती, जमातीसह, खुल्या प्रवर्गासाठी विशेष योजना राबविण्यात येतात. यासाठी अर्ज करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झालेली असून निवडीची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
विविध योजना, यंत्र व घटकांसाठी अर्ज करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती एसएमएस आलेला आहे, यामध्ये त्यांना पुढील 07 दिवसांमध्ये कागदपत्र अपलोड करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. पात्र शेतकऱ्यांना पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक ती कागदपत्र महाडीबीटी फार्मर पोर्टलवर लॉगिन करून अपलोड करावी लागणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून संबंधित विजेत्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे.
कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी त्याचप्रमाणे पेरणी यंत्र, कापणी यंत्र, फवारणी यंत्र, कडबा कुटी मशीन इत्यादी बाबीसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असेल व त्यांना लॉटरी लागलेली असेल, अशा संबंधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे कागदपत्र अपलोड करावी लागतील.
- आधारकार्ड
- बँक पासबुक
- टेस्ट रिपोर्ट
- साहित्य खरेदी कोटेशन
- GST बिल
- शेतकरी हमीपत्र
- करारनामा
कृषी यांत्रिकीकरण योजनेव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी सिंचन साधने आणि सुविधा या घटकांतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याची अस्तरीकरण अशा बाबीसाठी अर्ज केलेला असेल, त्यांनासुद्धा लॉटरी लागलेली आहे, त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादनाच्या अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना किंवा एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज केलेला होता, त्यांनासुद्धा संबंधित योजनेची लॉटरी लागलेली आहे.
अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांनी नवीन विहीर, विहिरीची दुरुस्त अशा योजनांसाठी बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अर्ज केलेला होता, अश्या शेतकऱ्यांना एसएमएसच्या माध्यमातून लॉटरी लागल्याची कल्पना संबंधित कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.
Kusum Solar Pump Upcoming Quota
महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणांच वाटप केलं जातं. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी बियाण किट वाटपासाठी ऑनलाईन अर्ज केलेला होता, अशा शेतकऱ्यांची सुध्दा लॉटरी पद्धतीमध्ये निवड झालेली असून लवकरच शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक यांच्याकडून टोकन दिले जातील. टोकन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाण खरेदीसाठी दुकानाचा पत्ता दिला जाईल, अशा दुकानावरती जाऊन शेतकरी बियाणं खरेदी करू शकतात. अनुदानाची रक्कम वगळून शेतकऱ्यांना त्वरित बियाणे वितरित केले जाईल, टोकन वितरण साधारणतः 10 जून 2023 पर्यंत करण्यात येईल, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आलेली आहे.