MahaDBT Farmer Lottery List 2023 : महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी यादी प्रसिद्ध; तुमचं नाव यादीत आलं का ?

MahaDBT Farmer Lottery List 2023 : महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण, सिंचन, साधने व सुविधा, फलोत्पादन अशा विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते. लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती एसएमएस पाठविला जातो आणि यादी सुद्धा प्रसिद्ध केली जाते.

01 सप्टेंबर 2023 सोडत यादी

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी योजनेमध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पावर टिलर, कडबा कटर इत्यादी कृषी अवजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सोडत यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची कृषी विभागाकडून निवड करण्यात आलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील. कागदपत्र अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्वसंमती देऊन पुढील कार्यवाही कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येईल.

सोडत यादीत नाव आल्यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजीची सोडत यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment