सातबारा आता 24 भाषांमध्ये सातबाऱ्याची भाषा बदली; पहा कसा दिसतो सातबारा : Land Record in 24 Languages

शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीशी निगडित महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा होय. सातबारा आपण सामान्यतः जर पाहिला, तर मराठी भाषेमध्ये आपल्याला आढळून येतो. मात्र आता यापुढे आपल्याला जमिनीचा सातबारा 24 भाषांमध्ये उपलब्ध होणार असून यासंदर्भात शासनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तर चला जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती.

Land Record in 24 Languages

आपल्याला असा एखादासुध्दा शेतकरी हुडकून सापडणार नाही, ज्याला सातबारा म्हणजे काय माहिती नसेल. फक्त शेतकरीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सातबारा उतारा अवगत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी असो किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी असो सातबारा हा खूपच महत्त्वाचा विषय आहे.

आपण पूर्वीचा विचार केला, तर कोणत्याही प्रकारची आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तलाठ्यांकडून हस्तलिखित सातबारा तयार केला जायचा; परंतु कालांतराने यामध्ये बदल करत महसूल विभागाने संगणकीकृत डिजिटल सातबारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचू लागला शिवाय डिजिटल सातबाऱ्यावरती सही किंवा शिक्क्याची आवश्यकता नसल्यामुळे तलाठी कार्यालयाच्या चकरा थांबल्या.

सातबारा आता 24 भाषांमध्ये मिळणार

शेतकऱ्यांना सुविधांचा लाभ जलद व सोयीस्कर गतीने घेता यावा, यासाठी महसूल विभागाकडून सतत नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान सुविधा वापरण्यात येतात. आता यामध्ये अशाच एका सुविधाची भर टाकण्यात आलेली असून एक महत्त्वपूर्ण बदल महसूल विभागाकडून सातबारा उताऱ्यामध्ये करण्यात आलेला आहे. सातबाऱ्यावरील तो महत्वपूर्ण बदल म्हणजे शेतकऱ्यांना आता सातबारा 24 भाषांमध्ये मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती देणारा सातबारा शेतकऱ्यांसाठी आता मराठी भाषेसह इतर 23 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. विविध भाषांमध्ये जमिनीचा उतारा ज्याला आपण Land Record म्हणतो तो 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयोग सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या महसूल विभागात सध्यास्थितीत 2 कोटी 62 लाख सातबारा उतारे आहेत. सातबारा उताऱ्याचे जवळपास 4 कोटी खातेदार असून उपलब्ध सातबाऱ्यापैकी 2 कोटी 58 लाख सातबारा फेरफार नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.

खालील 24 भाषांमध्ये तुमचा 7/12 पहा

महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर तुमच्या शेतजमिनीचा सातबारा बघण्यासाठी सुरुवातीला फक्त मराठी भाषा हा Default पर्याय दिसायचा; परंतु त्याठिकाणी आता भाषा निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला असल्यामुळे तुम्ही सातबारा पाहण्यापूर्वी तुमच्या आवडीची भाषा निवडून संबंधित गटाचा सातबारा पाहू शकता.

  • मराठी
  • इंग्लिश
  • हिंदी
  • बंगाली
  • गुजराती
  • पंजाबी
  • मल्याळम
  • तमिळ
  • तेलगू
  • कन्नडा
  • ओरिया
  • उर्दू
  • असामी मणिपुरी
  • नेपाली
  • कोकणी
  • मैथिली
  • डोंगरी
  • बोडो
  • संतली
  • सिंधी
  • कश्मीरी देवनागरी
  • कश्मीरी
  • संस्कृत

नवीन 24 भाषेतील डिजिटल 7/12 कसा काढावा ? येथे क्लिक करुन पहा !

Leave a Comment