कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क क्रमांक व लाभार्थी यादी आता ऑनलाईन पहा !

केंद्र व राज्यशासनाच्या निर्णयानुसार महाकृषी ऊर्जा अभियान-प्रधानमंत्री कुसुम सौरपंप योजना अंतर्गत गरजू शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची योजना सुरू करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाकडून कुसुम सोलर पंपाचे दर, सौरपंप पुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि लाभार्थी यादी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासंदर्भातील थोडक्यात पण कामाची माहिती याठिकाणी आपण पाहणार आहोत.

कुसुम सोलर पंप कंपनी, लाभार्थी यादी

कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क क्रमांक व लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पीएम कुसुम नवीन आणि नावीन्यपूर्ण ऊर्जा मंत्रालयाला भेट द्यावी लागेल. केंद्रशासनाची अधिकृत वेबसाईट खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. वेबसाईटला भेट देऊन तुम्ही संबंधित माहिती मिळवू शकता.

ऑनलाईन यादी अशी पहा !

पीएम कुसुम नावीन्यपूर्ण ऊर्जा मंत्रालय पोर्टल उघडल्यानंतर मुख्य मेनूमध्ये तुम्हाला “Public Information” या टॅबवर क्लिक करून Scheme Beneficiary List मध्ये आपले राज्य, जिल्हा निवडून पंपाची क्षमता निवडावी आणि Go या बटणावर क्लिक करावे. पुढे तुम्ही पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाहू शकता.

यामध्ये राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 3 एच.पी, 5 एच.पी व 7.5 एच.पी क्षमतेच्या सौर कृषीपंपासाठी अर्ज केला असेल, त्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली आहे. शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एच.पी 5 एच.पी 7.5 एच.पी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौरपंप उपलब्ध होणार व स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सुविधा असेल.

याचप्रमाणे तुम्हाला पंप क्षमता, पंपाचा प्रकार, पंपाचा उपप्रकार, पंप श्रेणी, कंट्रोलर प्रकार इत्यादी माहिती पहावयाची असल्यास State Wise Vender list and Rate Card या पर्यायावर क्लिक करून आपण राज्यनिहाय कंपनी संपर्क विक्रेता यादी आणि कुसुम सोलर पंपाचे दर कार्ड पाहू शकता.

सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क साधा : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) अमरावती : 0721 2661610 मुंबई : 022 4968558 औरंगाबाद : 02402653595 नागपूर : 0712 256425 कोल्हापूर : 0231 2680009 नाशिक : 0253 2598685 लातूर : 02382 226680 पुणे : 020 35000454 मुख्यालय पत्ता : औंधरोड पशुसंवर्धन आयुक्तालया शेजारी स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे – 411007 दूरध्वनी क्रमांक-020 35000450 email -re@mahaurja.com

👇👇👇👇👇👇👇👇

Leave a Comment