Government Course : शेतकऱ्यांच्या पोरासाठी केंद्र शासनाचा मोठा निर्णय ! 10वी 12वी तरुणांना कृषी क्षेत्रात संधी; फक्त 15 दिवसात करिअर घडवा

Government Course : केंद्र व राज्यशासनाकडून शेतकऱ्यांच्या मुलासाठी विविध योजना व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आणखी काही घटकांची भर घालून आता कृषीक्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 10वी पास, 12वी पास तरुणांनासुद्धा खत आणि बियाणे व्यवसाय करण्याची परवानगी मिळणार आहे. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

दहावी पास तरुणांना करिअर संधी

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंधरा दिवसाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तरुणांना खत आणि बियाणांचा दुकान सुरू करता येणार आहे. शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्रात रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. सोबतच खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना कोणत्याही उच्च शिक्षणाची किंवा अनुभवाची आवश्यकता या कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी लागणार नाही.

या क्षेत्रात रोजगारांची मोठी संधी उपलब्ध असल्यामुळे खेड्यापाड्यातील तरुणांना खूपच कमी वयात आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवता येईल; परिणामी युवकांना स्वावलंबी होण्यास मदत होईल.

करिअर करण्यासाठी आवश्यक पात्रता

  • कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थी किमान दहावी उत्तीर्ण असावा.
  • कृषी विज्ञान केंद्रात कमीत कमी 15 दिवसाचा संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक.
  • अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परीक्षेला बसून परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक.
  • परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर प्रमाणपत्राची आवश्यकता.
  • प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित अर्जदार परवानासाठी अर्ज करू शकतात.

रोजगार वाढवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून कृषी क्षेत्रातील नियमात बदल करण्यात आलेले आहेत. या क्षेत्रात पूर्वी काम करण्यासाठी बीएससी एग्रीकल्चर किंवा डिप्लोमा इन एग्रीकल्चर असणे आवश्यक होते; मात्र आता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनासुद्धा कीटकनाशके आणि खत बियाणांचा व्यवसाय करता येणार आहे. व्यवसाय पात्रता प्राप्त करण्यासाठी उमेदवारांना खत-बियाणे केंद्रात 12,500 रु. इतका नोंदणी शुल्क भरावा लागेल.

संबंधित कृषी क्षेत्रातील करिअर संधी नुकतीच घोषित करण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती, प्रशिक्षण कालावधी, मानधन, परवाना कसा काढावा? यासंदर्भातील संपूर्ण माहिती संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर आपल्या वेबसाईटवरती याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात येईल.

विविध शेतकरी योजनांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment