सोने तारण कर्ज घेण्याचे फायदे, आवश्यक कागदपत्र, परतफेड इत्यादी संपूर्ण माहिती

Gold Mortgage Loan : आर्थिक परिस्थिती बिकट आल्यास आपल्या जवळील सोने तारण ठेवून अल्प मुदतीसाठी आपण पैशाची तडजोड करू शकतो. कोरोनाच्या काळामध्ये अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. दैनंदिन खर्च निघत नसल्यामुळे व बँकेच्या अटी शर्तीमुळे बहुतांश लोकांनी त्या काळात घरातील सोने गहाण ठेवून कर्जावर पैसे घेतले होते.

सोने तारण कर्ज माहिती

आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी सोने तारण ठेवून कर्ज घेणे हा एकदम सोपा व सुरक्षित उपाय आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे सोने असेल, तर कोणत्याही कागदपत्राशिवाय विलंब न लावता एकरकमी कर्जाचे रक्कम मिळविता येते.

सोने तारण कर्ज काढताना सोन्यावर आपल्याला किती कर्ज मिळतं ? सोने तारण ठेवताना कोणती काळजी घ्यावी ? सोने तारण ठेवताना लागणारी आवश्यक कागदपत्रे ? महत्त्वाचे फायदे, प्रक्रिया शुल्क, परतफेड कालावधी इत्यादी संपूर्ण माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्याकडे सोने असेल आणि भविष्यात काही कारणास्तव तारण ठेवून कर्ज मिळवायचे असल्यास ही माहिती नक्की वाचा.

सोन्यावर किती कर्ज मिळत ?

सोन्यावर 10 हजारापासून एक कोटीपर्यंत कर्जाची रक्कम दिली जाऊ शकते. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत सोने तारण कर्जावर खूपच कमी व्याजदर आकारला जातो. तुमच्याकडील सोने जर 18 कॅरेट किंवा त्याहून अधिक असेल, तरच तुम्हाला गोल्ड लोनसाठी अर्ज करता येतो. तुमच्याकडील उपलब्ध सोन्यावर किती कर्ज देण्यात येणार याची व्याख्या विविध बँकेनुसार वेगवेगळी असू शकते. आरबीआयकडून सोन्याच्या कर्जाची मर्यादा 75 टक्के निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही 1 लाखाचे सोने गहाण ठेवल्यास अंदाजित तुम्हाला 75 हजार रुपये कर्ज देण्यात येतं.

तारण ठेवताना घ्यावयाची काळजी

सोनी तारण ठेवून कर्ज घेताना संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजदराची सविस्तर माहिती घ्यावी. बँक कोणत्याही प्रकारचे इतर चार्जेस आकारणार नाही याची काळजी घ्यावी. यासोबतच प्री-पेमेंट, प्रोसेसिंग-फी, री-पेमेंट चार्ज हा सगळा तपशील तपासून घ्यावा.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • दोन पासपोर्ट फोटो
  • आधारकार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र
  • इतर कागदपत्र

गोल्ड लोनचा फायदा

कमी व्याजदर : वैयक्तिक कर्जासारख्या असुरक्षित कर्जाच्या तुलनेत गोल्ड लोनचा व्याजदर खूपच कमी असतो.

प्रक्रिया शुल्क : कमी व्याजदराव्यतिरिक्त सोनी तारण कर्जासाठी प्रक्रिया शुल्क, फोरक्लोजर शुल्क इत्यादी शुल्क खूपच कमी आकारण्यात येत.

कागदपत्राची कमी : गोल्ड लोनसाठी इतर लोनप्रमाणे भरपूर कागदपत्राची आवश्यकता भासत नाही. फक्त आवश्यक ती कागदपत्र दिल्यानंतर काही वेळा तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देण्यात येत.

सिबिल स्कोरची आवश्यकता नाही : इतर कोणत्याही कर्जाप्रमाणे तारण कर्जासाठी सिबिल स्कोर ची आवश्यकता भासत नाही त्यामुळे सोने तारण कर्ज कोणत्याही व्यक्तीला सहजासहजी घेता येतं.

जलद प्रक्रिया : इतर कर्जासाठी जास्त कागदपत्र लागतात पण सोने तारण कर्जासाठी कागदपत्राची आवश्यकता खूपच कमी असल्याने उत्पन्न किंवा इतर कोणत्याही गोष्टी न तपासता लवकरात लवकर जलद प्रक्रिया करून सोने तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत.

सोन तारण परतफेड प्रक्रिया

इतर कर्जाप्रमाणे तुम्हाला गोल्ड लोनचा काही भाग आणि मुद्दल दरमहा ईएमआय स्वरूपात भरावा लागतो. गोल्ड लोनची परतफेड अनेक प्रकारांमध्ये येते. जश्याप्रकारे बुलेट परतफेड, ईएमआय आणि मुद्दल नंतर व्याज भरणे, नियमित ईएमआय किंवा आंशिक देयक इत्यादी

Leave a Comment