Gharkul Yadi 2023 : अशी पहा ग्रामपंचायत घरकुल यादी ऑनलाईन

Gharkul Yadi : मित्रांनो, तुम्ही खेड्यापाड्यातील असाल आणि तुम्हाला ग्रामपंचायत घरकुल यादी ऑनलाईन पाहायची असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील गरजू नागरिकांना राहण्याची म्हणजेच घराची सुविधा उपलब्ध करून दिले जाते. ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून त्यांना लाभ दिला जातो.

प्रधानमंत्री ग्राम आवास योजना

प्रधानमंत्री ग्राम आवास योजना हा केंद्र शासनाचा गोरगरिबांसाठी राबविण्यात आलेला महत्त्वपूर्ण प्रकल्पातून या प्रकल्पा अंतर्गत सरकारकडून नागरिकांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध करून दिला जातो व घरकुल मंजूर करून दिलं जातं. सदरची योजना प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) किंवा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या नावानं ओळखली जाते. 01 एप्रिल 2016 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या या घरकुल योजनेच्या माध्यमातून गरीब लाभार्थी कुटुंबांना घरकुलाच्या स्वरूपात काही प्रमाणात आर्थिक मदत केली जाते. ज्याचा वापर लाभार्थी स्वतःच घर बांधण्यासाठी करू शकतात. आवास योजनेअंतर्गत पूर्वी घरकुल बांधण्यासाठी फक्त 70,000 रु. इतकी रक्कम दिली जायची; मात्र यामध्ये आता वाढ करून लाभार्थ्यांना घरकुलासाठी 1.20 लाख रु. इतकी रक्कम दिली जाते.

📣 शबरी घरकुल योजना GR आला ! आता प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार

तुम्ही प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केला असेल, तर नवीन घरकुल यादी नुकतीच शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री ग्राम आवास योजना घरकुल यादी तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन तपासता येणार आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहुयात.

नवीन घरकुल यादी 2023

शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत बहुतांश गावामध्ये काही लाभार्थ्यांच्या घरकुलाची काम सुरू असून काही लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालं आहे. जर तुम्हाला नवीन घरकुल मंजूर यादी पहावयाची असेल, तर अशी यादी ऑनलाईन पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला मंजूर लाभार्थ्यांची घरकुल यादी दिसेल. घरकुलासाठी अर्ज करताना मोठ्या प्रमाणावर अर्जदारांकडून अर्ज केला जातो; परंतु मुळात ऑनलाईन यादी पाहताना मंजूर घरकुल लाभार्थ्यांची यादी कमी दिसून येते.

घरकुल यादी कशी पहावी ?

गावातील नागरिकांना ग्रामपंचायतला भेट दिल्यानंतर घरकुलाची यादी ऑनलाईन पाहण्याचा किंवा बघण्याचा सल्ला दिला जातो. तर आपण याठिकाणी ग्रामपंचायतची नवीन मंजूर घरकुल यादी एकदम सोप्यापद्धतीने ऑनलाईन कशी पहावी किंवा कशी बघायची यासंदर्भात खाली टप्प्याटप्प्यामध्ये पाहणार आहोत. यादी पहात असताना तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरकुलाची यादी डाऊनलोडसुद्धा करू शकता.

  • तुमच्या मोबाईलमध्ये ग्रामपंचायत मंजूर घरकुल यादी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम या संकेतस्थळाला भेट द्या – येथे क्लिक करा.
  • वरील लिंकवर, क्लिक केल्यानंतर आता प्रधानमंत्री आवास योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या समोर उघडेल आणि तिथून तुम्हाला घरकुल यादी पाहता येईल, यासाठी खालील स्टेप्स अनुक्रमाने करा.
  • वेबसाइट उघडल्यानंतर तुम्हाला A, B, C, D, E, F, G, H याप्रमाणे विविध बॉक्स दिसतील. घरकुल यादी पाहण्यासाठी या बॉक्समधील ब्लॉक F मध्ये Beneficiary Registered, Account Frozen & Verified या पर्यायांवर क्लिक करा.
  • आता सिलेक्शन फिल्टरमध्ये वरील 2 पर्याय तसेच ठेवा आणि तुमचं राज्य निवडा.
  • त्यानंतर अनुक्रमे तुमचा तालुका, ब्लॉक, गावच नाव इ. निवडा आणि Captcha कोड टाका, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुम्हाला काही वेळात तुमच्या गावातील घरांच्या घरकुल याद्या तुमच्या समोर पाहता येतील, त्याचप्रमाणे Pdf स्वरूपात डाउनलोडसुध्दा करता येतील.

👇👇👇👇👇👇👇👇

नवीन घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment