Fertilizer Subsidy : शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजना खत खरेदीसाठी 100% अनुदान मिळणार

Fertilizer Subsidy : सन 2023 पासून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. सदर योजनेचा शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकांतर्गत अर्ज करावा लागतो. राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच सदर योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे, त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण लेखाच्या माध्यमातून पाहूयात.

Falbag Lagwad Anudan Yojana

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येतं. ज्याअंतर्गत विविध 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. फळबाग लागवड योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदान फक्त खड्डे खोदणे, कलम लागवड करणे, नांग्या भरणे या विविध बाबीसाठी देण्यात येत होतं; परंतु यामध्ये आता शेतकऱ्यांना फळबाग लागवड करतांना जी खत लागतील, त्या खतासाठीसुद्धा अनुदान देण्याची तरतूद नुकतीच करण्यात आलेली असून याची माहिती नवनिर्वाचित कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

या योजनेअंतर्गत खतांना अनुदान मिळावं यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. कृषी विभागामार्फतचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वकांक्षी ठरेल; कारण या वाढत्या महागाईमध्ये फळबाग लागवड करताना शेतकऱ्यांना खतासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्कम मोजावी लागत होती. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा भेटला आहे.

लाभ कोणाला मिळणार ?

ज्या शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला असेल, ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन सोडत पद्धतीने निवड झालेली असेल, अश्या सर्व शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांना अनुदानासह खतासाठीसुद्धा 100 टक्के अनुदान आता फळबाग लागवड योजनेअंतर्गत देण्यात येईल.

साधारणतः फळबाग लागवड खतांसाठी अनुदान किती ?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत यापूर्वीच्या आर्थिक मापदंडामध्ये खतांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. आता खताचा समावेश करण्यात आलेला असल्यामुळे नवीन आर्थिक मापदंड लवकरच कृषी आयुक्तालय विभागाकडून तयार करण्यात येईल; परंतु सध्यास्थितीत रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या फळबाग लागवड मापदंडाचा विचार केला तर, जवळपास हेक्टरी तीन वर्षासाठी 20 हजार रुपये इतकं अनुदान खतांसाठी शेतकऱ्यांना मिळू शकत.

योजनेबद्दलच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment