शेतकरी मित्रांनो ! पेरणी करताय; बियाणांची उगवण क्षमता तपासली का ?

गेल्या चार-पाच दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. राज्यामध्ये मान्सूनसुद्धा दाखल झालेला आहे. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांमार्फत सोयाबीन किंवा इतर पिकांची पेरणीची लगबग लागणारच. मात्र, पेरणीपूर्व शेतकऱ्यांना गडबड न करता काळजीपूर्वक व हुशारीने बियाणांची खात्री करून पेरणी करावी लागेल. बोगस बियाणामुळे वर्षभर केलेले शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाणे नीट निरखून निवडावे व त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन राज्यातील प्रत्येक कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत केली जात आहे.

पावसाने हजेरी लावली न लावली, बऱ्याच जिल्ह्यामध्ये भात लागवडी योग्य क्षेत्र असलेल्या ठिकाणी भाताची पेरणीसुद्धा मोठ्या जोमाने सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांमार्फत मागील वर्षाच बियाणे पेरणीसाठी वापरण्यात येतं; असं बियाणं पेरणीपूर्वी वापरण्यासाठी बियाण पेरणी योग्य आहे की नाही ते तपासून पाहण अत्यंत महत्त्वाचा आहे. किमान 70 टक्के चांगलं व निरोगी बियाण मोड आलेले असल्यास सदर बियाण पेरणीसाठी योग्य आहे, असे शेतकरी समजू शकतात. बियाणांची उगवण क्षमता तपासल्यानंतर जर 70 टक्केपेक्षा कमी उगवण क्षमता असेल, तर असं बियाण शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरू नये.

बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी ? येथे क्लिक करून पहा

Leave a Comment