Bhumi Abhilekh : भूमी अभिलेख नवीन पोर्टल/वेबसाईट सुरू पहा फेरफार उतारा, नकाशा, 7/12, 8अ उतारा

Bhumika Abhilekh : शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाकडून आनंदाची बातमी ! वारंवार येणारी तांत्रिक अडचण, सातबारा (7/12) उतारा आँनलाईन डाऊनलोड न करता येणे अशा विविध बाबींची दखल घेऊन भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेखचे Bhumi Abhilekh New Portal सुरू केले आहे. आता या नवीन भूमी अभिलेख पोर्टलवरती शेतकऱ्यांना जमिनीसंबंधित सर्व सुविधा जलदगतीने व एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

Bhumi Abhilekh New Website

नवीन अध्यायावत सुरू करण्यात आलेल्या भूमीअभिलेख पोर्टलवरती शेतकरी व नागरिकांना एकंदरीत 17 सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील सर्व कागदपत्र जशाप्रकारे 7/12 उतारा, नकाशा, फेरफार इत्यादी कागदपत्र काढण्यासाठी कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. घरबसल्या मोबाईलवर काही मिनिटातच सर्व कागदपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. तुम्ही काही मिनिटांतच भूमी अभिलेख पोर्टलवर खालील 17 सुविधांचा लाभ मिळवू शकणार आहात.

या विविध 17 सुविधांचा लाभ महसूल विभागाकडून नागरिकांना घरबसल्या जरी मिळत असला, तरी यासाठी थोडीफार रक्कम मोजावी लागणार आहे. खालील 17 कागदपत्रांपैकी कोणताही कागदपत्र तुम्हाला हवं असेल, तर त्यासाठी कमीत कमी 15 रु. शुल्क तुम्हाला ऑनलाईन आकारण्यात येईल, ज्याची भरणा तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातून करू शकता.

  • 7/12 उतार डिजिटल स्वाक्षरीसहित
  • 8-अ उतारा डिजिटल स्वाक्षरीसहित
  • फेरफार उतारा
  • 7/12 फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज
  • मालमत्ता पत्रक (Property Card)
  • मालमत्ता पत्रक फेरफार
  • अधिकार क्षेत्र जाणून घेणे
  • फेरफार स्थिती तपासणी
  • प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरण
  • ई-अभिलेख
  • ई-नकाशा/भू-नकाशा
  • आपली चावडी
  • इ-मोजणी
  • अभिलेख पडताळणी
  • ई-चावडी जमीन महसूल भरणा
  • ई-कोर्ट
  • ई-पीक पाहणी

नागरिकांसाठी भूमीअभिलेख हा नवीन पोर्टल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे अनेक कामे घरबसल्या होतील; परिणामी वेळ वाचेल व सर्व काम जलद गतीने होतील. त्याचप्रमाणे यामध्ये विविध सुविधा देण्यात आलेल्या आहेत, जश्याप्रकारे शेतकऱ्यांना भुमिअभिलेखच्या नवीन प्रणालीद्वारे वारस नोंदीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

घरबसल्या वारस नोंदणी कशी करावी ? येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा

भुमिअभिलेखच्या नवीन पोर्टलवरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा 7/12 पाहता येईल, डिजिटल सहीसहित वरील नमूद सर्व कागदपत्र डाऊनलोड करता येईल परंतु, यासाठी शुल्क द्यावा लागणार आहे. याबद्दलची माहिती आपण वरील लेखात पाहिली आहे.

जुन्यातील जुना सातबारा उतारा 8 मालमत्ता पत्रक फेरफार इत्यादी शेती व प्रॉपर्टीशी निगडित सर्व कागदपत्र नागरिकांना या साइटवरून काढता येतील.

भूमीअभिलेख नवीन वेबसाईट/पोर्टल पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment