बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी संच, या वेबसाईटवर करा नोंदणी | Bandhkam Kamgar Yojana

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे लाभ दिले जातात. यापैकी महत्त्वाचा दिला जाणारा लाभ किंवा योजना म्हणजे भांडी संच योजना होय. सदर योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार पोर्टलवर नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोफत भांडी संच देण्यात येतात, ज्यामध्ये गृहपयोगी वस्तूंचा समावेश असतो.

बांधकाम कामगार भांडी संच योजना

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील नागरिकांना थोड्याफार प्रमाणात अर्थसहाय्य म्हणून प्रमुख भांड्यांचा संच दिला जातो. जर तुम्ही एक बांधकाम कामगार असाल, तर तुम्हीसुद्धा सदर योजनेसाठी पात्र ठरणार आहात. परंतु यासाठी तुमची नोंदणी प्रक्रिया सक्रिय असणे आवश्यक आहे. जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी सक्रिय असेल, तर तुम्हाला नक्कीच भांडी संच योजनेचा लाभ मिळवता येईल.

या भांड्याच्या संचामध्ये लाभार्थी कामगाराच्या कुटुंबातील महिलांसाठी उपयुक्त अशा भांड्यांचा समावेश असेल. या लेखामध्ये आपण भांड्याच्या संच्यामध्ये कोणत्या विविध घरगुती वस्तूंचा समावेश असेल, त्याचप्रमाणे यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय व ऑनलाईन अर्ज पात्र लाभार्थ्यांना कशा पद्धतीने करता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

भांडी संच योजनेसाठी पात्रता

 • अर्जदार लाभार्थी बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदारांनी बांधकाम कामगार पोर्टलवर नोंदणी केलेली अनिवार्य असेल.
 • बांधकाम कामगार वेबसाईटवर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
 • बांधकाम कामगारांनी केलेली नोंदणी सक्रिय असणे आवश्यक आहे, नोंदणी सक्रिय नसल्यास लाभ दिला जाणार नाही.
 • तुमची नोंदणी सक्रिय आहे किंवा नाही याची स्थिती तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार प्रोफाईलमध्ये तपासू शकता.
 • लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ हवा असल्यास, त्यांची फोटो आणि बोटांचे ठसे आवश्यक लागतील.

भांडी संचमधील वस्तू

भांडी संच योजनाच्या माध्यमातून पात्र बांधकाम कामगार लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे विविध भांडी देण्यात येतील.

 • 4 जेवणाची ताट
 • 4 पाणी पिण्याचे ग्लास
 • 3 पातेले आणि त्यावरील झाकण
 • भात वाढण्याचा चमचा
 • 2 लिटर पाण्याचा जग
 • स्टीलची कढाई
 • 5 लिटर स्टेनलेस स्टील कुकर
 • टाकी

सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगार लाभार्थ्यांनी शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करण्यात आल्यानंतर अर्जदाराची पडताळणी करून बांधकाम कामगार नोंदणी अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ सुद्धा लाभार्थ्यांना दिला जाईल.

अधिक माहितीसाठी योजनेचा शासन निर्णय (जीआर) येथे क्लिक करून बघा

👇👇👇👇

बांधकाम कामगार अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Leave a Comment