अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना सुरू; असा करा अर्ज

अण्णासाहेब पाटील आर्थिकमागास विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सवलत मिळावी, यासाठी ट्रॅक्टर योजना राबविण्यात येते. सदर योजनेला अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना नावान ओळखलं जातं. महामंडळाच्या वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगिती असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडूनच्या ट्रॅक्टर योजनेला पुन्हा सुरुवात होणार आहे. योजनेअंतर्गत महामंडळाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 50,000 रुपयापर्यंत सवलत मिळेल.

अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामार्फत पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना आता लवकरच ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळेल; कारण योजनेअंतर्गत महिंद्रा किंवा एस्कॉट टर्बो या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला असून सदरच्या योजनेची येत्या दसऱ्यापासून अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

महामंडळाकडूनच्या ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल किंवा सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या अर्ज पत्राद्वारेसुद्धा शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत. अर्जदाराला महामंडळाकडून कर्ज घेणे आवश्यक असेल, ही बाब अर्जदारांनी लक्षात घ्यावी. सदर योजनेमुळे मराठा समाजातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे सोपे होईल. ट्रॅक्टरमुळे शेतीला चालना मिळेल; परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल.

महामंडळाकडून योजनेत महत्त्वपूर्ण बदल

  • महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या हितासाठी योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत या बदलाची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता.
  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत कर्जमर्यादा 10 लाखावरून 15 लाखापर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
  • 3 लाख रुपयांच्या मर्यादित करण्यात आलेल्या व्याज परताव्याची मर्यादा 4.5 लाख रुपयापर्यंत वाढवून कर्ज कालावधी 5 वर्षाहून 7 वर्षापर्यंत वाढविण्यात आलेला आहे, यामुळे शेतकऱ्यांना दोन वर्षाची वाढीव मदत या ठिकाणी मिळेल.
  • महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वांकरिता वयोमर्यादेची अट 60 वर्षापर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

वरील महत्त्वपूर्ण बदलासह पुढील कालावधीत महामंडळ राज्यातील सर्व सीएससी केंद्रासोबत करार करणार असून, लाभार्थी शेतकऱ्यांना महामंडळाच्या विविध योजनाअंतर्गत ऑनलाईन अर्ज सीएससी सेंटरच्या माध्यमातून करता येणार आहे. भविष्यकाळात महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण युवकांना उद्योजक बनवण्यासाठी विविध ध्येय योजना अधिकाधिक संख्येने समोर ठेवण्यात आलेले आहेत. ज्यामुळे मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी या योजना लाभदायक ठरणार आहेत.

Leave a Comment