Crop Insurance News : शेतकऱ्यांना उर्वरित 1 हजार 19 कोटीचा अग्रीम विमा द्या; नाहीतर कार्यवाही होणार !

Crop Insurance News : पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेत ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. अश्या राज्यातील 24 जिल्ह्यामधील 45 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 2 हजार 55 कोटी रुपयांची 25% अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वीच देण्याचं ठरलं होतं, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून आत्तापर्यंत 1 हजार 36 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. अद्याप 1 हजार 19 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

उर्वरित अग्रीम नुकसान भरपाई

मंजूर 2 हजार 55 कोटी रुपयांपैकी शेतकऱ्यांना फक्त 1 हजार 36 कोटी रु. वाटप करण्यात आलेले असून उर्वरित 1 हजार 19 कोटी रुपयांची अग्रीम पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर वितरित करावी; अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल. असा संदेश देत कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या 3 दिवसात ही रक्कम न दिल्यास कार्यवाहीसाठी विमा कंपन्यांनी सज्ज असाव, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

चालू वर्षातील ऑगस्ट महिन्यात राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पावसाचा सतत 21 दिवस खंड पडला होता किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त झाला होता. परिणामी सोयाबीन व इतर पिकांच्या संभाव्य उत्पादनात सर्वेक्षणात 50 टक्यापेक्षा जास्त घट दिसून आली. कृषी विभागाच्या अहवालानंतर विमा कंपन्यांकडून 25% अग्रीम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी, असा आदेश राज्यसरकारकडून कंपन्यांना देण्यात आला. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून आधीसूचना जारी करण्यात आल्या होत्या.

एकूण मंजूर रक्कम 2 हजार 55 कोटी 90 लाख 96 हजार

नुकसान भरपाईपोटी राज्यातील 25 जिल्ह्यामधील 45 लाख 77 हजार 662 शेतकऱ्यांना जवळपास 2 हजार 55 कोटी 90 लाख 96 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ठरविण्यात आलं. मंजूर करण्यात आलेली ही रक्कम दिवाळीपूर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी चांगलाच प्रयत्न केला आणि त्यानुसार दिवाळीच्या दरम्यान शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यास सुरुवात झाली.

मात्र शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या रकमेपैकी फक्त 50 टक्केच रक्कम मिळालेली असून आत्तापर्यंत 23 लाख 2 हजार 647 शेतकऱ्यांना 1 हजार 36 कोटी 79 लाख 90 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. तर याउलट अजूनही विमा कंपन्याकडे 1 हजार 19 कोटी 11 लाख रुपयाची रक्कम प्रलंबित आहे, त्यामुळे ही प्रलंबित रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी, असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे.

🔔 कोणत्या जिल्ह्याला किती अग्रीम विमा मंजूर ? येथे क्लिक करून पहा !

कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या या आक्रमक निर्णयामुळे लवकरच शेतकऱ्यांना उर्वरित अग्रीम पीक विम्याची रक्कम जमा होईल अशी आशा आहे.

Leave a Comment