Advance Crop Insurance : या जिल्ह्यातील 59 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिक विम्याची रक्कम जमा !

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सतत पावसाचा खंड, अतिवृष्टी या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित विभागाकडून विमा कंपन्यांना देण्यात आलेल्या होत्या. या अनुषंगाने जिल्ह्यातील 59,004 शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 लाख रुपयांच्या आगाऊ पिक विम्याचे 41 कोटी रु. जमा करण्यात आलेले आहेत. दिवाळीपूर्वी आगाऊ पिक विमा शेतकऱ्यांना देऊन विमा कंपनीकडून दिलासा देण्यात आलेला आहे. राज्याच्या पिक विमा कंपनीने पीक विमा वाटपाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम जमा

राज्यातील बहुतांश ठिकाणी पिक विम्याची आग्रीम रक्कम दिवाळीपूर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत देण्यात आलेली होती. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पिक विमा रक्कम मिळावी, यासाठी संबंधित जिल्ह्यातील पालकमंत्री संजय राठोड यांनी पाठपुरावा केलेला होता. त्यांच्या या पाठपुराला यश आलेले असून रिलायन्स प्रॉपर्टी इन्शुरन्स कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची अग्रीम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे.

जिल्हात 3 लाख 66 हजार 989 शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. 8 लाख 44 हजार 757 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झालेले असून जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक आपत्ती जोखीम चेतावणी नोंदविली होती. आपत्ती जोखीम नोंदविल्यानंतर पंचनाम्याद्वारे प्राप्त झालेल्या सूचनेनुसार विमा कंपन्यांनी पिक विमा कार्यकारी महामंडळाकडून 59 हजार 404 शेतकऱ्यांना 41 कोटी रुपयांची भरपाई रक्कम 9 तारखेला जमा करण्यात आली आहे.

Leave a Comment