कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येतात. सिंचनाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यासोबतच विविध योजना राबविण्यात येतात. शेतीचा विकास होण्यासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेता शासनाकडून आता जुन्या योजनेत भर घालून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ती योजना म्हणजे नमो शेततळे योजना किंवा अभियान.
नमो शेततळे योजना महाराष्ट्र 2023
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसाच्या निमित्तान अकरा सुत्री कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अश्या नमो शेततळे अभियानाची घोषणा करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात तब्बल 7300 नवीन शेततळ्यांची निर्मिती केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या मागेल त्याला शेततळे या घटकाअंतर्गत जे शेततळे उभारण्यात येतील, त्यांचा देखील नमो शेततळे योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेततळे योजनेसाठी जो निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या निधीमधूनच नमो शेततळे योजना देखील राबविण्यात येणार आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या अटी, शर्ती व मार्गदर्शक सूचना नमो शेततळे अभियानासाठी किंवा योजनेसाठी कायम असणार आहेत.
| योजना नाव | नमो शेततळे योजना |
| सुरुवात दिनांक | 17 सप्टेंबर 2023 |
| विभाग | कृषी विभाग |
| लाभार्थी | शेतकरी वर्ग |
| अर्जाची प्रक्रिया | ऑफलाइन, ऑनलाईन |
| अधिकृत संकेतस्थळ | महाडीबीटी शेतकरी पोर्टल |
शेततळ्यासाठी अटी व शर्ती
- शेततळे बांधणी आदेश प्राप्त झाल्यापासून संपूर्ण कामाची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात करणे आवश्यक.
- कामासाठी कोणतेही इतर आगाऊ पैसे दिले जात नाहीत.
- शेततळ्याच्या देखभालीसाठी, दुरुस्तीसाठी संपूर्णता लाभार्थी जबाबदार असेल.
- शेततळे पूर्ण झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद करणे आवश्यक आहे.
- शेततळे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेततळे योजनेचा बोर्ड लावावा.
- शेताच्या बांधावर झाडाची लागवड करणे अनिवार्य.
- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास भरपाई नाही.
- गरज पडल्यास प्लास्टिकच्या अस्तरीचा वापर शेतकऱ्यांना स्वखर्चातून करावा लागेल.
नमो शेततळे अभियान शासन निर्णय (GR)
नमो शेततळे अभियाना संदर्भातील महत्त्वपूर्ण जीआर दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णयाचा आढावा घेतल्यास आपल्याला लक्षात येईल की, राज्यातील 82% शेती ही कोरडवाहू असून, ती सर्वस्व पाण्यावर म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. राज्यातील विविध भागात पावसात येणारे मोठे खंड व इतर अडचणी लक्षात घेऊन शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
शेततळ्याचे उपलब्धता करून दिल्यास शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध होतील व उत्पन्न दुपटीने वाढेल. याअनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेततळे अभियान राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.
Just signed into 789betmpls to place my bets. Feeling good, hoping to score some big wins! Good luck to all the serious betters out there! Find out more 789betmpls.
Heard ae789 is the place to be! Time to check it out and see what all the hype is about. Let’s go! What are you waiting for?: ae789