- कोणत्याही पिकाची बियाणे उगवण क्षमता तपासण्याची एकदम सोपी पद्धत म्हणजे संबंधित पिकाची 100 नग बियाणे घ्या. ते बियाणं पाण्यात टाका, त्यातील पाण्याच्या तळाशी गेलेले बियाणे निवड करून बाजूला काढा. ते गोंड पाठ किंवा वर्तमानपत्रावर पूर्णपणे ओली करून ठेवा.
- दहा ओळीमध्ये 10-10 बियाणे याप्रमाणे बियाणांची व्यवस्थित मांडणी करा. त्यानंतर कापडावरील बियाणे न हलवता, कापड गुंडाळून दोन्ही बाजूस सुतळीने किंवा रबराने बांधून घ्या.
- तीन ते चार दिवस सावलीत ठेवून त्यावर दिवसातून तीन ते चार वेळी कमी प्रमाणात पाण्याची फवारणी करा किंवा थोडसं पाणी शिंपडा.
- पाच ते सात दिवसाच्या अंतरात उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्या, शंभर बियाणंपैकी किती बियाणास मोड आलं आहे ते पहा ! ज्या बियाण्यास मोड आला असेल, ते बियाणे पेरणी योग्य आहे म्हणून समजा.
जर शंभर बियाण्यांपैकी 65 ते 70 बियाणे उगवले असतील, तर सदर बियाणे पेरणीसाठी योग्य समजून त्या बियाणांची तुम्ही पेरणी करू शकता. 60 किंवा 70 पेक्षा बियाणांची उगवण क्षमता कमी असेल, तर अशी बियाणे पेरणीसाठी वापरू नका.