Solar Project : शासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामधील महत्त्वाची एक योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना होय. सदर योजनेअंतर्गत पुढील वर्षात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी योजनेच्या माध्यमातून शेती क्षेत्र असलेल्या भागात 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील थोडक्यात पण कामाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहुयात.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी विस्तार
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून पुढील वर्षापासून म्हणजेच 2024 पासून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न चालू असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात शेती असलेल्या ठिकाणी 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प (5 किलोमीटर सबस्टेशनच्या अंतरात) उभारण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 267 पैकी 239 सबस्टेशन अंतर्गत असे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 2,069 एकरवरील गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाईल.
आपला भारत देश कृषीप्रधान असूनसुद्धा शेतकऱ्यांना मुबलक सुविधा, दिवसा वीजपुरवठा, पुरेशी वीज क्षमता मिळालेली नाही. याच सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही ऐतिहासिक योजना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून गायरान व खाजगी जमिनी घेऊन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी एका ठिकाणी 4 एकर जमीन असणे आवश्यक असून त्या जागेवर 1 मेगावॉट सौर प्रकल्प बसवता येईल.
10 एकरवर 5 मेगावॉटचा प्रकल्प
10 एकर जमिनीवर 2 ते 5 मेगावॉटपर्यंतचा प्रकल्प उभारला जाऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर 2 हजार 69 एकर गायरान जमिनीवर सौर प्रकल्पाची उभारणी होणार आहे. या प्रकल्पातून अंदाजित 50000 हून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखवला आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांसाठी योजनेतून सर्व प्रकल्प उभारले जातील.
शेतकऱ्यांना एकरी 50,000 रु.भाडे
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत गायरान व खाजगी जमीन ज्या शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात येईल. अशा सर्व शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी जमीन दिल्यानंतर वार्षिक एकरी 50 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख 25 हजार रुपये दरवर्षी भाड भेटेल. या योजनेसाठी शेतकऱ्यांना त्यांची जमीन 15 वर्षासाठी सरकारला भाडेतत्त्वावर द्यावी लागेल. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास आठ हजार एकर जमीन प्रकल्पासाठी देण्याची तयारी शेतकऱ्यांकडून दर्शविण्यात आलेली आहे.
सोलापूर जिल्हा सौर प्रकल्प स्थिती
एकूण सबस्टेशन | 267 |
सौर प्रकल्प बसणारे सबस्टेशन | 239 |
प्रकल्पासाठी गायरान जमीन | 2069 एकर |
100 टक्के गायरान जमीन | 29 सबस्टेशन |
30 ते 80 टक्के गायरान जमीन | 50 सबस्टेशन |
सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सौर प्रकल्प चालू असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा मानस आहे. शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली असल्यामूळे शेतकऱ्यांना नक्कीच भविष्यकाळात फायदा होणार आहे.
सौर पंपाचा किती कोटा शिल्लक ? आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी अर्ज केला !