PM Kisan योजना 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या महिन्यात वितरित होणार ! यांना हफ्ता मिळणार नाही

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रु रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. आत्तापर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. एका आर्थिक वर्षात प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाते.

15वा हफ्ता खात्यात जमा

शासनाकडून शेतकऱ्यांना 15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झारखंड भेटीदरम्यान पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता वितरित करण्यात आला. आता बहुतांश शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हफ्त्याची. शासनाकडून पुढील हप्ता मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल, अशी शक्यता आहे.

साधारणतः केंद्रशासनाकडून दरवर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत पहिला हप्ता, ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत दुसरा हप्ता आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत तिसरा हप्ता वितरित करण्यात येतो. 2023-24 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना सदर योजनेचे 2 हप्ते मिळाले आहेत. पंधराव्या हप्त्यात शासनाकडून 110 दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 28.10 दशलक्ष रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक

तुम्हाला मागील 15वा हप्ता मिळाला नसेल किंवा पुढील हप्ता साठी काही अडचण येत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे.

15 वा हफ्ता मिळाला नाही ? ‘याठिकाणी’ तक्रार करा, हफ्ता 100% मिळणार

पुढील क्रमांकावरती तुम्ही कॉल करून पीएम किसान योजनेच्या अडचणी संदर्भातील प्रश्न विचारू शकता. 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 याव्यतिरिक्त ई-मेल पाठवण्यासाठी ई-मेल आयडी सुविधासुद्धा पुढीलप्रमाणे देण्यात आलेले आहे. pmkisan-ict@gov.in

या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता

या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी काही कठोर नियम शासनाकडून सुरू करण्यात आले. ज्यामध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी असेल किंवा जमीन पडताळणी (land seeding) असेल किंवा त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असेल यापैकी कोणतीही प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली नसल्यास, तर त्यांना पुढील येणारा हप्ता मिळणार नाही, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.

PM Kisan 16th Installment Date 2024

Yojana NamePM Kisan Yojana
MinistryMinistry of Agriculture & Family Affairs
BeneficiariesSmall Scale Farmers
BenefitRs. 6,000 Per Year
Total Installment3 Installment in Year
Launch Year2018
Transfer MethodDBT
WebsiteClick Here

Leave a Comment