Satbara : सातबाऱ्यावर करण्यात आलेल्या बदलाची माहिती आता एसएमएसद्वारे मोबाईलवर मिळणार

महाराष्ट्र राज्यातील जमिनीसंदर्भात सातबारा (Satbara) किंवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत असल्यास त्याची माहिती तत्पर शेतकऱ्यांना समजण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून याबद्दलची सविस्तर माहिती संबंधित लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. भूमि अभिलेख विभाग शेतकऱ्यांकडून नाममात्र शुल्क करून ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे.

7/12 बद्दल मेसेज आला !

सध्यास्थितीत भूमिअभिलेख विभागाने जास्तीत जास्त ऑनलाईन पत्रिकांचे मिळकत डिजिटल पद्धतीने भूमी अभिलेख सातबारा उताऱ्यावरती केले आहे. याशिवाय आता लवकरच सातबारा उताऱ्यावरील बदलाची माहिती देण्यास सुरुवात केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून ‘अधिकार अभिलेख’ म्हणजे सातबारा उतारा अथवा मिळकत पत्रिकांचे डिजिटायझेशन राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने केले आहे.

याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना फेरफार उताऱ्यावरील 100% नोंदी या ऑनलाइन घेतलेल्या लगेच समजणार आहेत. महसूल विभागाकडून काही वेळी निकालाच्या किंवा इतर नोटिसा अर्जदारांपर्यंत पोहोचण्यास खूप वेळ लागतो, याचा विचार करून जमिनीच्या मोजणीची ई-नोटीस अर्जदारांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-मोजणी वर्जन 2 हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सातबाऱ्यावरील बदलाची माहिती स्वरूप

राज्य शासनाकडून नाममात्र दर ठरविण्यात आल्यानंतर प्रति मिळकत दरवर्षी तेवढे शुल्क शासनाकडे जमा करावी लागेल. जेव्हा कधी त्या मिळकतीवर मोजणी माध्यमातून हद्दीत अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदलाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू असेल, तर त्याचा एसएमएस संबंधित शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पाठविण्यात येईल. सुशिक्षित शेतकऱ्यांनी ई-मेल नोंदविला असेल, तर त्यावरतीसुद्धा माहिती पाठविण्यात येईल.

📢 हे पण वाचा : एका क्लिकमध्ये डिजिटल सातबारा डाऊनलोड करा

जमीन मोजणीच्या माध्यमातून अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदल होत असल्यास संबंधित शेतकऱ्यांना त्याची माहिती नवीन पोर्टलच्या माध्यमातून जमीन मालकास तत्काळ मिळणार आहे. भूमि अभिलेख विभागाने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला असून यासाठी कमीत कमी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो.

भूमी अभिलेख विभागाच्या या नवीन सुविधेमुळे जमिनीच्या (Satbara) मालकांना महाभुमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर सतत नजर ठेवण्याची गरज राहणार नाही. भूमी अभिलेख विभागाकडून ही सुविधा नागरिकांना अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

👇👇👇👇👇👇👇👇

Leave a Comment