Crop Loan : नाबार्डकडून पिक कर्ज उचलण्याच्या मर्यादेत वाढ ! पहा शेतकऱ्यांना कोणत्या पिकाला किती पीक कर्ज मिळणार ?

शेतकऱ्यांना शेतीची मशागत करत असताना आर्थिक सहाय्य लागत असतं. सध्यास्थितीत शेतकऱ्यांची एकंदरीत स्थिती पाहता गेल्या वर्षापासून नैसर्गिक आपत्ती, पावसाचा अभाव अशा विविध बाबीमुळे शेतीसाठी लागणारा खर्च आणि त्यातून मिळणारा उत्पन्न खूपच कमी झाल्याकारणाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून नाबार्डकडून आता पीक कर्जाच्या मर्यादित वाढ करण्यात आलेली आहे.

नाबार्डकडून पीककर्ज मर्यादा वाढ

शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या, बियाणांच्या व औषधांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मजुरीच्या खर्चातसुद्धा मोठी वाढ झाली आहे. इतकाच काय शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या विविध उपकरणासाठीचे डिझेल किंवा पेट्रोल प्रचंड प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते. या सर्वांचा भार नक्कीच पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही पीक कर्ज मिळते ते देखील आता उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये वाढीव मिळावे, अशी बहुतांश शेतकऱ्यांची आशा होती.

हाच विचार करता आता नाबार्डच्या माध्यमातून पीककर्ज उचलण्याच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आता विविध पीकाकरिता वाढीव दराने पीककर्ज मिळणार आहे. उदाहरणार्थ सर्वाधिक वाढीव पीककर्ज अडसाली ऊसासाठी ठरविण्यात आलेले असून हेक्टरी 1 लाख 70 हजार रुपयापर्यंत अडसाली ऊसासाठी पीक कर्ज मंजुरी देण्यात येईल.

कोणत्या पिकासाठी किती वाढीव कर्ज ?

जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून कर्ज वाढीची शिफारस केली जाते व त्याची सविस्तर तपासणी राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून केल्यानंतर नाबार्डच्या मान्यतेने वाढीव दराच्या सूचना संबंधित वित्तीय संस्थांना दिल्या जातात. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बँकेने पीक कर्जाच्या दरामध्ये वाढ केली आहे. कोणत्या पिकासाठी किती वाढ संबंधित बँकेकडून करण्यात आलेली आहे, याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता.

कर्ज उचलीचे स्वरूप

वाढीव पीककर्ज उचल मर्यादेनुसार आता आडसाली ऊसाला 1 लाख 70 हजार रुपये, पूर्व हंगामी ऊसाला 1 लाख 40 हजार रुपये, सुरुवातीच्या ऊस लागणाला 1 लाख 35 हजार रुपये, ऊस खोडवा 1 लाख 15 हजार रुपये, भात पिकासाठी 50 हजार रुपये सोयाबीनकरिता 66 हजार रुपये, नागलीकरिता 36 हजार 800 रुपये, फळबागांकरिता 55 हजार रुपये, पालेभाज्याकरिता 30 हजार रुपये याप्रमाणे कर्ज उचलीचे स्वरूप असणार आहे.

पिकाचे नाववाढीव कर्ज रक्कम
आडसाली ऊस1 लाख 70 हजार रु.
पूर्व हंगामी ऊस1 लाख 40 हजार रु.
लागणी ऊस1 लाख 35 हजार रु.
खोडवा ऊस1 लाख 15 हजार रु.
भात पिकासाठी50 हजार रु.
सोयाबीन पिकासाठी66 हजार रु.
नागीलीकरीता36 हजार 800 रु.
फळबागसाठी55 हजार रु.
पालेभाजीकरिता30 हजार रु.

👇👇👇👇👇👇👇👇

Leave a Comment