राज्यातील तरुणांना व्यवसायाच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. यापैकीच एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना होय. ही योजना मुख्यमंत्री यांच्या हस्ते राबविण्यात येत असून राज्यातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी मुबलक प्रमाणात कर्ज सदर योजनेच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
राज्यामध्ये दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. आर्थिकदृष्ट्या या बाबीचा विचार केला, तर ही समस्या खूपच गंभीर असून यामुळे राज्यावर मोठा परिणाम होणार आहे. याच सर्व बाबीचा विचार करता महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू केलेली आहे. जर तुम्हालासुद्धा एखादा व्यवसाय करून उत्पन्न मिळवायचा असेल, तर तुम्ही नक्कीच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊ शकता.
या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांना 25 लाखापर्यंत कर्ज आणि 35 टक्क्यापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येतं. आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना काय करावे लागेल? कर्जाचा लाभ कसा घ्यावा? कर्ज घेण्यासाठी अर्ज कुठे व कसा करावा? काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील? यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आपला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख ते 25 लाख रुपये इतकं कर्ज देण्यात येणार आहे. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून या संधीच्या माध्यमातून लाभार्थी शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळवू शकतात आणि आपला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू शकतात.
संबंधित योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना सर्वप्रथम शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर आपला अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अर्ज दाखल करावयाचा असेल, तर खालील देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावा.
वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे पर्याय दिसतील, त्यापैकी पहिल्या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर तुमचा म्हणजेच लाभार्थ्यांचा आधार क्रमांक, संपूर्ण नाव, जिल्हा, तालुका व इतर आवश्यक माहिती भरून घ्या. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुमचा अंतिम अर्ज सबमिट करा. अर्ज करताना कोणती कागदपत्र लागतील यासाठी खाली देण्यात आलेली कागदपत्रांची यादी पाहू शकता.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्यांचा आधारकार्ड
- लाभार्थी पॅनकार्ड
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा पुरावा (आवश्यक असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्र
तुम्हाला सुद्धा स्वबळावर उद्योग किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करावयाचा असेल, तर तुम्ही शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मिळवू शकता. यासाठी वरीलप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्र आणि अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीची प्रक्रिया संपूर्ण करावी लागेल. तुम्ही जर संबंधित योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच शासनाकडून व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून तुमच्या प्रकल्प अहवालानुसार रक्कम अदा करण्यात येईल.