महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. आता याच धर्तीवर महावितरणकडून देखील शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यासाठी महावितरण कंपनीकडून नवीन पोर्टल तयार करण्यात आलेला असून पात्र शेतकऱ्यांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून महावितरणकडून सदर सोलर पंपाचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे ती खालीलप्रमाणे.
महावितरण कृषी सोलरपंप पात्रता
महाराष्ट्र शासनाच्या कुसुम सोलर पंप योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना महावितरणकडून 1 लाख कृषी सौर पंप वितरण करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी महावितरणकडून नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली असून विशिष्ट शेतकऱ्यांना संबंधित वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला या लेखाच्या शेवटी देण्यात आलेली आहे. अर्जासाठी खालील अटी वाचल्यानंतरच लाभार्थ्यांनी अर्ज करावा.
आता बहुतांश शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे ? कुसुम सोलर पंपाची नोंदणी सध्या तरी बंद आहे; मग ही सोलर पंपाची नवीन नोंदणी कोणती ? तर ज्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केलेला असेल आणि असे अर्जदार शेतकरी विजेच्या जोडणीच्या प्रतीक्षेत असतील व त्यांनी महावितरणकडे पैसे भरून प्रतीक्षामध्ये असतील, असेच शेतकरी या सौर कृषी पंपासाठी पात्र असतील.
महत्त्वाची सूचना
तुम्ही जर यापूर्वी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सौर पंपासाठी अर्ज केलेला असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला याठिकाणी अर्ज करताना तुमचा आधार क्रमांक यापूर्वी कुसुम सोलर पंप योजनेसाठी नोंदणी केलेला आहे असं दाखवण्यात येईल, त्यामुळे आपण नवीन नोंदणी त्या आधार क्रमांकवरती करू शकणार नाही, याची नोंद घ्यावी.
कुसुम सोलर पंप योजना पात्र लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोंदणी कुठे आणि कशी करावी ?
तुम्ही जर विद्युत जोडणीसाठी महावितरणकडे कोटेशन भरले असेल आणि तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये असाल, तर तुम्हाला विद्युत जोडणीऐवजी सौर कृषी पंप घेण्याची इच्छा असेल, तर महावितरणकडून देण्यात आलेल्या खालील लिंकवर क्लिक करून तुमचा ग्राहक क्रमांक टाकून तुम्ही ऑनलाईन महावितरणच्या कृषी सोलर पंपासाठी नोंदणी करू शकता.
- नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून “पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का?” येथे Yes बटनवरती क्लिक करा.

- त्यानंतर महावितरणकडून देण्यात आलेला ग्राहक क्रमांक त्या ठिकाणी टाका आणि शोधा या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमची सविस्तर माहिती दाखवली जाईल.

- पुढे तुमचे सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती देण्यात येईल.
- यूजर आयडी पासवर्ड भेटल्यानंतर कुसुम सोलर पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याठिकाणी तुमचा फॉर्म भरून कागदपत्र अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
Yo, wjpesocasino is legit! Had some good luck there last night. Easy to navigate and the games were smooth. Definitely worth checking out. Just remember to play responsibly! Check it out here: wjpesocasino
Just jumpin’ in to say I spent some time on fun97a last night. Website looks cool, easy to use and I had fun playing some Baccarat. If you are looking a spot, you should try fun97a! Click here for awesome deals: fun97a