Gas Cylinder Subsidy : मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 दिवशी केंद्रशासनाकडून गॅस सिलेंडर दराबाबत एक महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आला. महिलांच्या घरगुती वापरातील महत्त्वाचा दुवा असणारा गॅस सिलेंडर सध्यास्थितीत खूपच मोठ्या प्रमाणावर आकडेवारी पार केलेला आहे. केंद्रशासनाकडून गृहिणींना रक्षाबंधनाची भेट द्यावी, या अनुषंगाने गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला असून आजपासून गॅस सिलेंडरचे हे नवीन दर लागू असणार आहे.
आजपासून गॅस सिलेंडर इतक्या रुपयात
घरगुती स्वयंपाकातील गॅस (LPG) सिलेंडरच्या किमती आता केंद्रशासनाकडून 200 रुपयांनी कमी करण्यात आलेल्या आहेत. रक्षाबंधन, दिवाळी व लक्ष्मीपूजन या विविध उत्साहाचा अवचित साधून महिलांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून हा महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आला असेल, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. शासनाचा काहीही हेतू असला, तरी या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
हा निर्णय 30 ऑगस्टपासून म्हणजेच रक्षाबंधनापासून लागू झालेला असून आज दिनांक 01 सप्टेंबर 2023 पासून नागरिकांना 200 रु. कमी दराने गॅस सिलेंडर संबंधित गॅस विक्रेत्याकडून दिला जाणार आहे. याशिवाय सरकार उज्वला योजनेअंतर्गत जवळपास 75 लाख महिलांना नवीन सिलेंडर मोफत देणारा असल्याची माहिती सुध्दा देण्यात आली आहे. याची अधिकृत अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल.
400 रू. गॅस सबसिडी मिळणार
जनसामान्य नागरिकांसोबत उज्वला गॅसधारक महिलांना शासनाकडून मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यामार्फत पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीस्तव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्यात आली, तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता पूर्वी दिला जाणारा 200 रुपयांचा सबसिडी व आता नव्याने मिळणारा 200 रुपयांचा लाभ अश्याप्रकारे एकंदरीत उज्वला लाभार्थ्यांना 400 रुपयांचा लाभ दिला जात आहे. साधारणता लाभार्थ्यांना 703 रुपयांचा एक सिलेंडर मिळेल अशी आशा आहे.
आजपासून होणार अंमलबजावणी
कोरोना महामारीच्या वाईट परिस्थितीमुळे जून 2020 मध्ये शासनाकडून गॅस सिलेंडरवरील सबसिडी बंद करण्यात आलेली होती. सार्वजनिक किरकोळ इंधन क्षेत्रात, पेट्रोलियम कंपन्या बुधवारपासून किमती कमी करतील असा अंदाज संबंधित विभागाकडून दर्शविण्यात आलेला आहे, यानंतर शासनाकडून यासाठीची भरपाई पेट्रोलियम कंपन्यांना देण्यात येईल. आज नव्या महिन्याच्या 01 सप्टेंबर 2023 पासून सदर गॅस सिलेंडर कपातीची अमलबजावणी सुरू होणार आहे.
उज्वला योजनाचा 7680 कोटीचा टप्पा पार
शासनाच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर कितपत परिणाम होईल ? याचा अद्याप आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. सदर प्रकरणाबाबत बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, उज्वला योजना ग्राहकांना एलपीजीसाठी प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्यात येते, चालू वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात ही रक्कम 780 कोटी रुपये असेल. उज्वलाचे लाभार्थी केवळ 9.6 कोटी आहेत, तर 31 कोटी ग्राहक घरगुती स्वयंपाकासाठी एलपीजी वापरतात. याचा अंदाज बांधून आपण शासनाला येणारा खर्च जाणू शकतो.
📍 महिलांना आर्थिक सहाय्य देणारी – महिला किसान योजना