MahaDBT : कृषी सिंचन योजना अंतर्गत शेततळे व सूक्ष्म सिंचनासाठी शासनाकडून अनुदान मंजूर; शासन निर्णय पहा

राज्यातील शेतकऱ्यांना शास्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात शासनाकडून 19 ऑगस्ट 2019 रोजी मान्यता देण्यात आली असून सूक्ष्म सिंचनासोबतच शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणी, शेडनेट इत्यादी घटकाकरिता शासनाकडून अनुदान वितरित करण्यात येते.

सूक्ष्म सिंचनासाठी 160 कोटी निधी मंजूर

कृषी आयुक्तालयाकडून संदर्भ क्र. 7 अन्वये प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाकरिता 140 कोटी व संदर्भ क्रमांक 8 अन्वये प्राप्त मागणीच्या अनुषंगाने वैयक्तिक शेततळे व घटकाकरिता 20 कोटी असा एकूण 160 कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन 2023-24 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे या घटकासाठी 160 कोटी रुपये इतका निधी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचा वाटप लाभार्थी शेतकऱ्यांना निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येईल.

शेततळे, सिंचनासाठी अर्ज कसा करावा?

शासनाकडून शेततळे व सिंचनासाठी चालू आर्थिक वर्षामधील निधी वाटप करण्यात आलेला आहे. तुम्हालासुद्धा शेततळ्यासाठी किंवा सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत विविध घटकासाठी अर्ज करावयाचा असेल, तर महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

📢 कडबा कुटी मशीनसाठी 20,000 रु. अनुदान मिळवा ! येथे करा अर्ज

सध्यास्थितीत ज्या शेतकऱ्यांनी 2023-24 या आर्थिक वर्षात अर्ज केलेला असेल, अश्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शासनाकडून निधी प्राप्त झालेला असून या निधीची एकत्रित मंजूर रक्कम 160 कोटी रुपये इतकी आहे. चालू मधील लाभार्थी यादी तुम्ही खालील रखाण्यामध्ये पाहू शकता किंवा महाडीबीटी वेबसाईटला भेट देऊन संबंधित यादी पाहू शकता.

निधी वाटप शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा
MahaDBT शेतकरी पोर्टलयेथे क्लिक करा
ठिबक तुषार सिंचन नवीन यादीयेथे क्लिक करा

Leave a Comment