Kanda Anudan : खूप दिवसापासून रखडलेला कांदा अनुदानाचा मुद्दा काल दिनांक 21 ऑगस्ट 2023 दिवशी सुटलेला आहे; कारण काल कांदा अनुदान शासन निर्णय निर्गमित करण्यात आला ज्याअंतर्गत 13 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कांदा अनुदान वाटप केले जाणार आहे. कांदा अनुदान यादी जिल्ह्यानुसार देण्यात आलेली असून कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहूयात.
Kanda Anudan यादी जिल्हानिहाय
चालू वर्षातील फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. यामुळे राज्य शासनाकडून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकानकडे अथवा नाफेडकडे ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेली असेल, त्यांना अनुदान देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांसहित विविध शेतकरी संघटनांनी केलेली होती.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये इतका अनुदान देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय सत्तावीस मार्च 2023 रोजी घेण्यात आलेला होता; परंतु काही कारणास्तव ही प्रक्रिया रखडली आणि अद्याप शेतकऱ्यांना Kanda Anudan देण्यात आल नाही. ही बाब बहुतांश शेतकरी व इतर विभागातील कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या निदर्शनास आणल्यानंतर आता 21 ऑगस्ट 2023 दिवशी 465.99 कोटी रु. अनुदान वितरित करण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आलेली आहे.
13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदान
शासनाला राज्यातील 23 जिल्ह्यामधून कांदा अनुदान मागणीसाठी प्रस्ताव प्राप्त झालेला होता; परंतु यामधील तब्बल 13 जिल्ह्यातील अनुदानाची मागणी अल्पस्वरूपाची असल्याने 13 जिल्ह्यातील सर्व पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
कांदा अनुदानाच्या संपूर्ण अटी व शर्ती येथे क्लिक करून पहा !
उर्वरित दहा जिल्ह्यांची मागणी जिल्हानिहाय 10 कोटीपेक्षा जास्त असल्याकारणाने सदर 10 जिल्ह्यातील सर्व कांदा उत्पादक पात्र शेतकऱ्यांना 53.94 टक्क्यानुसार निधीचा पहिला हप्ता लवकरच त्यांच्या बँकखात्यावरती वितरित करण्यात येणार आहे.
या 10 जिल्ह्यांना पहिल्या टप्यात 378 कोटी
खाली देण्यात आलेल्या 10 जिल्ह्यातील कांदा उत्पादक अनुदान लाभार्थ्यांची रक्कम जास्त असल्याने पात्र लाभार्थ्यांना Kanda Anudan दोन टप्प्यांमध्ये वितरण केलं जाणार असून पहिल्या टप्प्यातील 378 कोटी 58 लाख 95 हजार 807 रु. अनुदान देण्यात येणार आहे.
- नाशिक
- उस्मानाबाद
- पुणे
- सोलापूर
- अहमदनगर
- औरंगाबाद
- धुळे
- जळगाव
- कोल्हापूर
- बीड
21 ऑगस्ट 2023 चा कांदा अनुदान शासन निर्णय (GR)