Umang App Satbara Download : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सातबारा उतारा संदर्भातील हा महत्त्वपूर्ण अपडेट असून जर तुम्ही शेतकरी असाल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. आता शासनामार्फत शेतकऱ्यांना ७/१२ उतारा उमंग या ॲपवरून देखील काढता येणार आहे. महाभुलेखच्या वेबसाईटप्रमाणेच उमंग ॲपवरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा सातबारा (७/१२) डिजिटल स्वरूपात काढता येईल. उमंग ॲपवरून नक्की शेतजमिनीचा सातबारा कशाप्रकारे काढावा ? हे आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि नजीकचा जर कोणता दाखला असेल, तर तो म्हणजे त्यांच्या शेतजमिनीचा सातबारा होय. पूर्वी शेतकऱ्यांना शेतजमिनीचा सातबारा (७/१२) मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असेत हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना सातबारा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची सुविधा राज्यात सुरू करण्यात आली. त्यासाठी महाभुलेख हा नवीन पोर्टल शासनाकडून विकसित करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा सहज व सोप्या पद्धतीने जवळील सीएससी केंद्रावर किंवा महा ई-सेवा केंद्रावर उपलब्ध होऊ लागला.
उमंग ॲपवरून डिजिटल ७/१२ कसा डाऊनलोड करावा ? यासाठी येथे क्लिक करा !
राज्यातील 35 जिल्ह्यातील 358 तालुक्यात 44 हजार 560 महसुली गावे असून यामध्ये जवळपास 02 कोटी 57 लाख सातबारे डिजिटल स्वरूपात करण्यात आलेले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातील शेत जमिनीच्या सातबाराचा विचार केला, तर 99% पेक्षा जास्त सातबारा उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. महसूल विभागाकडून विकसित करण्यात आलेल्या महाभुमी या वेबसाईटवरसुद्धा शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा डाऊनलोड करता येतो; परंतु ही प्रक्रिया शेतकऱ्यांना किचकट व गुंतागुंतीचे वाटते, त्यामुळे कधी कधी प्रयत्न करून सुद्धा शेतकऱ्यांना सातबारा डाऊनलोड करता येत नाही.
शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनाकडून आता उमंग या शासकीय ॲपच्या मदतीने सातबारा डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्याप्रमाणे यापूर्वी नागरिक महाभुलेख पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल सातबारा डाऊनलोड करत होते, त्याचप्रमाणे उमंग ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातबारा डाऊनलोड करता येणार आहे. उमंग ॲपवरून नक्की कशाप्रकारे तुमच्या सातबारा PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता, यासाठी वरील लिंकवर क्लिक करून माहिती पहा.