बांधकाम कामगारांसाठी शासन सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असत. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आता शासनाकडून ई-कार्ड मोबाईलवर डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती आपण संबंधित लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
बांधकाम कामगार ई-कार्ड
पूर्वी बांधकाम कामगारांना त्यांच कार्ड मिळवण्यासाठी जवळील बांधकाम कामगार कार्यालयात जावे लागते असत. महाराष्ट्र शासनाने आता कामगारांसाठी घरबसल्या बांधकाम कामगार ई-कार्ड डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कम्प्युटर किंवा मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ई-कार्ड डाऊनलोड करू शकता. चला तर मग बघू, ई-कार्ड कस डाऊनलोड करायच आणि त्याचे फायदे काय आहेत.
ई-कार्ड म्हणजे काय ?
बांधकाम E-Card बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाच्या बांधकाम इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात आलेल एक ओळखपत्र आहे.
🔵 हे पण वाचा : बांधकाम कामगार मोफत भांडी संच योजना
या कार्डच्या माध्यमातून कामगारांना या कार्डच्या माध्यमातून कामगारांना विविध शासकीय बांधकाम कामगार योजना, वैद्यकीय मदत, घरकुल योजना, अत्याआवश्यक संच किट, शैक्षणिक योजना इत्यादीचा लाभ दिला जातो.
बांधकाम कामगार E-Card चे फायदे काय ?
🔘 कामगार क्षेत्रातील ओळखपत्र असल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ सहज मिळवता येईल.
🔘 ओळखपत्र म्हणून कोणतेही शासकीय कामकाजात वापरता येईल.
🔘 ई-कार्ड खराब झाल्यास किंवा हरवल्यास पुन्हा डाऊनलोड करता येईल.
🔘 E-कार्ड घरबसल्या डाऊनलोड करता येत असल्यामुळे वेळ व प्रवासातील खर्च वाचेल.
🔘 E-Card ची ऑनलाईन पडताळणी सोप्या पद्धतीने करता येईल.
बांधकाम कामगार ई-कार्ड डाऊनलोड कस कराव ?
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला बांधकाम कामगार E-Card डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही MAHABOCW या पोर्टलवर नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे. जर तुमची नोंदणी झाली नसेल, तर आजच अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून घ्या.
- सर्वप्रथम बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईट उघडल्यानंतर Profile Login या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक त्याठिकाणी टाका.
- आता Proceed to Form या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठविण्यात येईल, तो OTP त्याठिकाणी टाकून सबमिट करा.
- Otp टाकल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही लॉगिन झालेले असाल.
- आता स्क्रीनच्या सर्वात शेवटी आल्यानंतर तुम्हाला E-Card हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर E Card Registration Print या बटनावर क्लिक करा, लगेच तुमचा बांधकाम कामगार e-card डाऊनलोड होईल.
- डाउनलोड झालेला ई-कार्ड पीडीएफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा किंवा प्रिंट काढून घ्या.
👇👇👇👇👇👇
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महाराष्ट्र कामगार मंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला कामगार E-Card उपक्रम खूपच चांगला आहे. या उपक्रमामुळे कामगारांना आता कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही.