मुलींना मोफत शिक्षण मिळणार, शासनाचा मोठा निर्णय : Free Education For Girls

राज्यातील मुलींना शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येतात. या विविध शैक्षणिक योजनामध्ये आणखी एका योजनेची भर टाकून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. राज्यातील मुलींना मोफत शिक्षण मिळणार असून यासाठी कोणत्या मुली पात्र असतील ? या योजनेचा लाभ कसा घ्यावा ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचून घ्या.

मुलींना मोफत शिक्षण मिळणार

राज्यातील मुलींची शैक्षणिक प्रगती वाढविण्यासाठी याचप्रमाणे कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठीची योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविली जात आहे. फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स या योजनेची संकल्पना शासनाकडून सुरू करण्यात आलेली असून या योजनेचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत काही विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्याचा विचार करून सरकारकडून मोफत शिक्षण योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती चंद्रशेखर पाटील यांच्यामार्फत देण्यात आली. मुलींना आता राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात इंजिनिअरिंग, पदवी अथवा मेडिकल, पॉलिटेक्निक अशा विविध प्रकारच्या कोर्सेससाठी कोणत्याही प्रकारची फीस भरावी लागणार नाही. या योजनेची अंमलबजावणी जून 2024 पासून सुरु करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

लाभार्थी व पात्रता

मोफत शिक्षण योजनेअंतर्गत पात्र मुलींना शिक्षण देत असताना यामध्ये एकूण 800 कोर्सेसचा समावेश करण्यात आलेला आहे. 800 कोर्सेसमधून पात्र मुलीकडून जो कोर्स निवड करण्यात येईल, त्या कोर्ससाठी एक रुपया सुद्धा फी भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच शिक्षण घेण्यासाठी पात्र लाभार्थी मुलींना कोणत्याही प्रकारची फीस भरावी लागणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी. लाभार्थी मुलीच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा यापेक्षा कमी असावे. सदरची योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेली आहे.

मोफत शिक्षणासाठी महत्त्वाची कागदपत्रे

मुलींना महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विद्यालयात मोफत शिक्षण मिळवण्यासाठी शासनाकडून काही महत्त्वाचे ठराविक कागदपत्र देण्यात आलेली आहेत ती खालीलप्रमाणे.

  • मुलींचे आधारकार्ड
  • उच्च शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला
  • गुणवत्ता प्रमाणपत्र व गुणपत्र
  • ओळखीचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • इतर आवश्यक कागदपत्र

👇👇👇👇👇👇👇👇

मुलींना या योजनेतून मिळणार 1 लाख रुपये नक्की अर्ज करा

Leave a Comment