जमीन मोजणी करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत असतात. जमिनीचा वाद वाढल्यास किंवा कायदेशीररित्या जमीन मोजणी करावयाची असल्यास शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे मोजणी अर्ज सादर करावा लागतो; परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून ठरविण्यात आलेल्या दरानुसार एकरी रक्कम भरावी लागते. जर शेतकऱ्यांना गाव पातळीवर फक्त आपली जमीन किती आहे ? याची तपासणी करावयाची असल्यास या लेखात आपण एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत.
जमिनीची मोजणी पद्धत
तुमच्या शेतजमिनीच्या बांधाची लांबी व रुंदीसह नकाशा पाहावयाचा असेल व तुमच्या मोबाईलवरती जमिनीची मोजणी करावयाची असेल, तर या तांत्रिक युगात मोजणीसाठी विविध सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर एका ॲपच्या माध्यमातून तुमच्या शेतजमिनीचा अक्षांश व रेखांश लक्ष्यात घेऊन तुमच्या जमिनीची मोजणी करू शकता.
जमिनीच्या बांधावरून होणारे वाद कमी व्हावेत, त्याचप्रमाणे आपल्या जमिनीची हद्द किंवा सीमा शेतकऱ्यांना माहिती असावी, यासाठी शासनाकडून मोजणीच्या पद्धतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे मोजणी अचूकरीत्या होत असून खूपच कमी वेळेत केली जात आहे. जमिनीचा नकाशा व मोजणी अचूकरित्या शेतकऱ्यांना माहिती झाल्यास जमिनीवर पीक घेताना मदत होते.
जमीन मोजणी कशी करावी ?
सर्वप्रथम तुम्हाला जमीन मोजणी Land Map Gps Area Calculator ॲपच्या माध्यमातून करावी लागेल. त्यासाठी खालीलप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया देण्यात आलेली आहे.
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले-स्टोअर उघडा.
- त्यानंतर त्या ठिकाणी गुगल मॅप कॅल्क्युलेटर असं सर्च करा.
- आता तुमच्यासमोर बऱ्याच एप्लीकेशन दाखवल्या जातील त्यामधील GPS Area Google Map कॅल्क्युलेटर हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलचा जीपीएस चालू करा.
- जीपीएस चालू केल्यानंतर इन्स्टॉल करण्यात आलेला एप्लीकेशन उघडा.
- तुमच्यासमोर संपूर्ण नकाशा दाखवला जाईल, त्या ठिकाणी तुमचा राज्य, जिल्हा व तालुका टाकून सर्च करा.
- तुमच्या जवळील नकाशा आल्यानंतर आता तुमच्या जमिनीच्या चारी बाजू कोपऱ्यांनी निवडून घ्या.
- त्यानंतर तुम्ही जमीन मोजणीसाठीचा परिमाण निवडून बिन चूक तुमच्या जमिनीची मोजणी करू शकता. यासाठी Square Feet किंवा Square Meter हा परिणाम निवडून घ्या.
- तुम्ही जमीन हेक्टरमध्ये सुद्धा मोजू शकता.
PM Kisan 15वा हफ्ता मिळाला नसले, तर याठिकाणी संपर्क करा !