Bhumi Abhilekh : पीक कर्जात मोठा बद्दल ! भूमि अभिलेख विभागाकडून निर्णय, 7/12 उताऱ्यावर एकाच बँकेकडून कर्ज

Bhumi Abhilekh : शेतकऱ्यांना शेतातील विविध कामासाठी सहज व सोप्यापद्धतीने भांडवल उपलब्ध व्हावं, यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत. देशभरातील राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज व्याजदर खूपच कमी ठेवण्यात आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करताना तितकी अडचण येत नाही. या पीक कर्जाची मुदत 12 ते 18 महिन्याच्या दरम्यान असते, यामुळे शेतकऱ्यांना अल्पशा व्यासदरासह मुदत वाढीमुळे कर्ज रक्कम फेडण एकदम सोप जात.

पीक कर्ज योजना 2023

बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात व्याजदरात सवलतसुद्धा देण्यात येते. विशेष म्हणजे 01 लाख 60 हजार रुपयापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय किंवा गहाण वस्तू ठेवल्याशिवाय देण्यात येत. याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना जमीन गहाण न ठेवता, शेतीसाठी भांडवल उपलब्ध करून देणे हा आहे.

शेतकऱ्यांकडून पीक कर्ज देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी करण्यात येत नसली, तरी बँका फसवणूक टाळण्यासाठी फक्त शेतकरी असल्याची खात्री करावी; म्हणून शेतकऱ्यांकडून जमिनीचा सातबारा उतारा घेतात. त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही जास्तीच्या कागदपत्राची मागणी बँकेकडून शेतकऱ्यांना करण्यात येत नाही.

एकापेक्षा जास्त बँकेकडून कर्ज ?

मागील काही वर्षाचा पिक कर्ज आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, बहुतांश शेतकऱ्यांकडून एकाच सातबारा उताऱ्यावर विविध बँकेकडून पिक कर्ज उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका सातबारावर 2 ते 3 बँकेकडून जवळपास दीड-दीड लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहजरीत्या उचललं जात आहे.

अश्या कर्जाची परतफेड वेळीच होत नाही, यामुळे शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या हितार्थ योजनेतून उलट बँकेची फसवणूक होताना उघडकीस आल्याकारणाने, यासाठी आता ठोस पर्याय म्हणून भूमीअभिलेख विभागाकडून बँकेची होणारी फसवणूक टाळण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

भूमि अभिलेख विभागाचा निर्णय

जमीन गहाण न ठेवता अश्या कर्जाच्या नोंदीची माहिती सर्व बँकांना उपलब्ध होईल, अशी व्यवस्था राज्यशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली असून, यासाठी एक नवीन संकेतस्थळसुद्धा विकसित करण्यात आलेला आहे. या संकेतस्थळावर बँकांनी शेतकऱ्यांना दिलेली सर्व प्रकारचे कर्ज, त्याचप्रमाणे चालू कर्ज नोंदविलेले असतील. त्यामुळे शेतकरी जेव्हा बँकेकडे कर्जाची मागणी करतील आणि त्यांचा सातबारा बँकेत देतील, त्यावेळी संबंधित सातबारा उताऱ्याच्या आधारावर शेतकऱ्यांनी कोणत्या-कोणत्या बँकेकडून कर्ज घेतले आहे किंवा नाही याची माहिती बँकेला काही क्षणात संकेतस्थळावरून उपलब्ध होईल.

📣 भूमी अभिलेख मोठा बद्दल – एकाच ठिकाणी 17 सुविधांचा लाभ

याशिवाय शेतकऱ्यांनी कर्ज फेडले असल्यास त्याची नोंद देखील संकेतस्थळावर बँकेला पाहता येईल. यामुळे कर्ज वितरित करत असताना योग्य शेतकऱ्यांनाच याचा लाभ देण्यात येईल. याबाबतची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाला देखील कळविण्यात आलेली आहे; मात्र अद्याप आरबीआयकडून याला हिरवा कंदील मिळालेला नाही; परंतु लवकरच आरबीआयकडून संकेतस्थळाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर सर्व बँकांसाठी हा संकेतस्थळ सुरू करण्यात येईल.

Leave a Comment