तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List 2023 Maharashtra

Crop Insurance List 2023 Maharashtra : यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांचा आमच्या जिल्ह्यासाठी पिक विमा किती मिळणार अशा प्रकारचा प्रश्न होता ? याच संदर्भातील जिल्हानिहाय पिक विमा यादी याठिकाणी आपण पाहणार आहोत.

पीक विमा यादी (लिस्ट) 2023 महाराष्ट्र

या टप्प्याअंतर्गत 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयांचा आगाऊ म्हणजेच अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी पिक विम्याची आगाऊ रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पहिल्या टप्प्यात, राज्याच्या पिक विमा कंपनीने 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा आगाऊ पिक विमा वाटप करण्याची मान्यता दिली आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट विम्याची रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जमा झाल्या संदर्भात एसएमएस मोबाईलवरती पाठवण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळालेला नसेल, त्यांनासुद्धा पिक विम्याची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात येईल.

अंतिम निकाल शेतकऱ्यांकडून

अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत, जिल्हा प्रशासनाने विविध जिल्ह्यातील पिक विमा कंपन्यांना नोटीस बजावल्या होत्या, त्यानुसार विमा कंपन्यांना 25% अग्रीम पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावा लागणार होता; परंतु काही विमा कंपन्यांनी विभाग आणि राज्यस्तरावर आव्हान केले, त्यानंतर अपिलावर सुनावणी सुरू करण्यात आली. संबंधित विमा कंपन्यांनी आत्तापर्यंत एकूण 1700 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे मान्य केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिकविमा वितरित करण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पीक विमा कंपन्यावरील सुनावणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या सर्व प्रक्रियेचा विचार करता शासनाकडून जिल्हानिहाय जाहीर करण्यात आलेली अग्रीम पिकविमा भरपाई शेतकऱ्यांना पुढील 2-3 दिवसांत वितरित करण्यात येईल.

👇👇👇👇👇👇👇👇

कोणत्या जिल्ह्याला किती पिक विमा ? पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment