Crop Insurance News : शेती व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटाला सामोरे जावं लागतं, ज्यामध्ये गारपीट, अवकाळी पाऊस, महापूर व अतिवृष्टी अशा विविध संकटांचा समावेश असतो. शेतकऱ्यांसाठी आशा नैसर्गिक समस्या खूपच त्रासदायक असू शकतात हीच बाब लक्षात घेऊन शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर करण्यात येते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नेमकी कशी व किती दिली जाते ? हा प्रश्न सर्वांसाठी कायमचा आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहूयात.
नुकसान भरपाई कशी व किती?
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबर पासून सुरू होत असून हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार. पिक विम्याच्या अग्रिमन रकमेमुळे विरोधक आधीच त्रासून आहेत, त्यामुळे सरकारला नक्कीच घेराव घेतील, याची सरकारला जाणीव आहे. हीच बाब लक्षात घेऊन बैठकीपूर्वी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्याचा सरकारचा मानस आहे.
रणांगणावर पंचनामा : विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी नुकसान भरपाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पंचनामा होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाला पंचनामा करण्यास सांगण्यात आले आहे. तिन्ही विभाग कार्यरत असून सुद्धा अद्याप पंचनामा झालेला नाही.
असा होतो पंचनामा
सध्या कृषी, महसूल आणि ग्रामविकास मंत्रालयामार्फत गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात पंचनामे सुरू आहेत. गावात पिक पेरणीच्या नोंदी आहेत त्यानुसार पंचनामाची प्रक्रिया सुरू असून गावातील गारपीट किंवा अवकाळी पावसाचे प्रमाण व पिकांचे किती नुकसान झाले, याची नोंद नंतर हेक्टरच्या संख्येवर केली जाईल. त्यात नुकसानीची टक्केवारी ही नोंदविण्यात येईल. सर्वांचा अहवाल राज्यस्तरावर सादर करण्यात येईल, त्यानंतर राज्यस्तरीय नुकसान, नुकसान टक्केवारी आणि भरपाईची रक्कम जाहीर केली जाईल.
नुकसान क्षेत्र
28 नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्या दरम्यान 4 लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली. मात्र 29 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर आणि 01 डिसेंबर रोजी अनेक भागात पाऊस झाला. त्याची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे नुकसान पातळी जास्त असल्याची माहिती दिली जात आहे.
📢 अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 36 कोटी मंजूर
नुकसान भरपाईसाठी दोन पर्याय
सध्याच्या नुकसान भरपाईची मदत शेतकरी दोन माध्यमातून मिळू शकतात. एक म्हणजे NDRF मार्फत सरकारी मदत आणि दुसरी म्हणजे पिक विमा. सर्व बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार एनडीआरएफकडून मदत केली जाते; परंतु पिक विमा खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा भरपाई दिली जाते. म्हणजेच पिक विमा सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नुकसान झाल्यासंदर्भात माहिती विमा कंपनीला कळविल्यानंतर शेतकरी पात्र असल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात येते.
नुकसान भरपाई किती मिळू शकते?
- अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळते याची माहिती “एनडीआरएफ” मानकांमध्ये देण्यात आली आहे.
- पिकांचं नुकसान झाल्यानंतर पंचनामामध्ये नुकसान प्रमाण ते 30 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास NDRF मार्फत मदत मिळू शकते. कोरडवाहू पिके किंवा बागायती पिके यानुसार पारंपारिक पिके, फळझाडे, वनीकरण पिके यांनासुद्धा भरपाई दिली जाते.
- नुकसान भरपाई मिळवण्यासाठी किमान नुकसान 33% असणे आवश्यक आहे. 33% पेक्षा जास्त नुकसान असले, तरीही भरपाईची रक्कम सारखीच असेल.
भुस्खलन नुकसान भरपाई
पूर किंवा मुसळधार पावसात जमिनीची झीज मोठ्या प्रमाणावर होते. डोंगराळ भागातील जमीन भुस्खलित होण्याच्या घटना घडत असतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आलेली आहे. जमीन खरडल्यास हेक्टरी 18,000 रुपये नुकसान भरपाई मिळते. जमीन ओरबडल्यास किमान नुकसान भरपाई 2,000 रुपये इतकी दिली जाते.
Hey everyone! Found a cool new spot, Fun8! They have some killer promotions going on right now, great time to sign up! Check it out for yourself: fun8
Heard mixed things about Reddyannabookonline. Some people swear by it, others say it’s unreliable. Haven’t personally tried it, so take these comments with a grain of salt. Do your research before you drop any dough. You can visit their site here: reddyannabookonline.