Crop Damage Compensation : नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून काही प्रमाणात रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून ही आर्थिक मदत माहे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. संबंधित नुकसान अनुदान वाटप करण्यासाठीचा निधी उपलब्ध झालेला असून लवकरच अनुदान वाटपाची सुरुवात करण्यात येईल.
गारपीट, अतिवृष्टी अनुदान
राज्यामध्ये माहे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये काही जिल्ह्यात गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. परिणामी या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली असून हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर वितरित केलं जाणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान आपल्या खात्यात प्राप्त करण्यासाठी डीबीटी पोर्टलवर केवायसी (KYC) म्हणजेच आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळील महा-ई-सेवा केंद्रावर भेट द्यावी लागेल. त्याठिकाणी केवायसी करताना शेतकऱ्यांना देण्यात आलेला व्हीके आयडी नंबर महा-ई-सेवा केंद्र ऑपरेटर चालकाला सांगावा लागेल.
अधिक वाचा :
* शेतकऱ्यांना 4 वर्षानंतर कर्जमाफी मिळणार
* शासनाच्या विविध 9 कर्ज योजना
* कुसुम सोलरपंप 2 लाख पंपांना मंजुरी
* अतिवृष्टी नुकसान भरपाई 2442 कोटी मंजूर
* PM किसान हफ्ता मिळाला नसेल, तक्रार करा