Land Record : तुम्हाला जर शेतजमीन असेल, तर सातबारा उतारा, फेरफार, भू-नकाशा, चतुरसीमा अश्या सर्व बाबींचा अभ्यास असेल किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी या गोष्टी ऐकल्या असतील. यासोबतच दुर्मिळ असा वाटणारा शब्द म्हणजे जमिनीच बक्षीसपत्र ! ही संकल्पना नेमकी आहे ? बक्षीसपत्र कसं आणि कुठ करायचं ? यासंदर्भातील थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
बक्षीसपत्र म्हणजे नेमकं काय ?
कोणतीही व्यक्तीच्या नावाने असलेली जमीन मग ती जमीन स्वतःच्या कष्टाने कमावलेली असेल अथवा जंगम मिळकत जमीन असेल, जमीनदार व्यक्ती स्वतःच्या इच्छानुसार आपल्या वारसांना, वारसापैकी एक अथवा वारस सोडून इतर व्यक्तींना किंवा स्वयंसेवी संस्थेस किंवा देशाला जमीन मालमत्ता देण्याची इच्छा लिखित स्वरूपात लिहून देत असेल, तर या प्रक्रियेला किंवा या स्वरूपाला बक्षीस पत्र असं म्हटलं जातं.
बक्षीसपत्राला इंग्रजीत Gift Deed या नावाने संबोधल जात. स्व कष्टाने कमावलेली जमीन अथवा जंगम मिळकत आपण बक्षीस पत्र म्हणून बहाल करू शकतो; परंतु वारसा हक्काने आलेली जमीन अथवा मालमत्ता मिळकतीचे बक्षीसपत्र करता येत नाही. बक्षीस पत्र साधा कागदावर स्वस्त लिखित स्वरूपात करता येईल; परंतु त्यासाठी कायद्याच्या कक्षेत बसणाऱ्या व्यक्तीकडून अर्जाचा मायना लिहून साक्षीदारांच्या सह्या व इतर नियम लागू असतील.
बक्षीसपत्रासाठी मुद्रांक शुल्क किती ?
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 2017 नुसार राज्य बक्षीसपत्र मालमत्तेच्या मूल्याच्या 3% मुद्रांक शुल्क आकारला जातो आणि कुटुंबातील रक्तातील सदस्यांना कोणतेही पैसे न देता शेतजमीन भेट म्हणून देण्यात आल्यास अशा परिस्थितीत आजच्या नियमानुसार रु. 500 स्टॅम्प व जागेच्या सरकारी मूल्याच्या 1% टक्के नोंदणी खर्च येतो.
रजिस्ट्री उपस्थिती अनिवार्य
बक्षीसपत्र रजिस्ट्री करत असताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यावे लागेल, जशाप्रकारे बक्षीस कोणाला देत आहोत, त्या व्यक्तींचा आपल्याशी नातं आणि स्पष्टीकरण लिहिणं अत्यंत महत्त्वाचा असतं. सोबतच मिळकत हस्तांतराचा दस्तावेज नोंदणी करताना नोंदणी कायद्यानुसार लिहून घेणारा व लिहून देणारा या दोघांची सही व इतर सोपस्कारंसाठी सह दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थिती असणे अनिवार्य आहे.
📣 अरे वाह ! शेतजमीन वारस नोंद, आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर करा !
बक्षीसपत्र साध्या कागदावर स्वहातानेसुद्धा करता येईल; परंतु काही कारणास्तव आपल्या नातलगांचा विरोध किंवा पुढे कोर्टात आवाहन दिल जाऊ शकतात यामुळे पूर्व काळजी म्हणून बक्षीसपत्र लिहून घेत असताना विश्वासातील दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात.