Ayushman Bharat : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारासाठी नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. आता देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत 5 लाख रुपयापर्यंत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून नुकताच घेण्यात आलेला आहे. आता सदरच्या योजनेअंतर्गत पिवळ्या, अंत्योदय शिधापत्रिका धारकांना केंद्रसरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे ?
गरिब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय उपचार आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यशासनाकडून सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना होय. दारिद्र्यरेषेखाली मोडणारे पात्र व्यक्ती किंवा पिवळे शिधापत्रिकाधारक सुद्धा आता 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत वैद्यकीय उपचार शासनाकडून मिळवू शकणार आहेत.
केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेसोबत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे एकत्रिकरण करण्यात आलेले असल्यामुळे आता एक लाख आरोग्य कव्हरेज वजा करून पाच लाख रुपये पर्यंतचे आरोग्य कवच देण्यात आलेले आहे; शिवाय उपचारासाठी रुग्णालयाची संख्यासुद्धा वाढविण्यात आलेली आहे.
फक्त यांनाच मिळणार लाभ !
यापूर्वी फक्त अन्नपूर्णा योजना, पिवळे शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय कार्डधारकांना सदर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत होता; परंतु राज्यातील नागरिकांकडून मागणी केली जात असल्यामुळे आता शासनाकडून सर्व शिधापत्रिका धारकांना 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य सेवा कव्हरेज प्रधान करण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे.
प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंत मदत
महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण झाल्यामुळे आता केवळ पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांनाच नाही, तर राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना वैद्यकीय उपचारासाठी 5 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत शासनाकडून केली जाणार आहे.
आयुष्मान भारत दवाखान्याची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा