खुशखबर ! कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 2 लाख कृषी पंपांना मंजुरी, शासन निर्णय आला | Kusum Solar Yojana

शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेली एक मात्र योजना म्हणजे कुसुम सोलार पंप योजना होय. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय शेतकरी बांधवांसाठी निर्गमित करण्यात आलेला आहे. कुसुम सोलापूर योजनेअंतर्गत महावितरणकडून शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख सोलारपंप दिले जाणार आहेत या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून याबद्दलची थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहूयात.

कृषी पंप योजना शासन निर्णय

शासनाने नव्याने मंजूर केलेल्या 1,00,000 पारेषण विरहित सौर कृषी पंप स्टेट मोडेल एजन्सी मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविण्यात आलेल्या उर्वरित किंवा प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्याच्या पूर्ततेसाठी (paid pending) आस्थापित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

केंद्रशासनाने दिनांक 30 ऑगस्ट 2022 च्या आणि 19 जानेवारी 2024 च्या केंद्रशासनाच्या आदेशान्वये महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या 2 लाख पारेषण विहिरीत सौर कृषी पंप राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्याच्या पूर्ततेसाठी आणि पीएम कुसुम घटक-बी योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जामधून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

नवीन अनुक्रमांक खालीलप्रमाणे समाविष्ट

  1. महाऊर्जाने पीएम-कुसुम घटक-ब साठीच्या पोर्टलवर महावितरण कंपनी लवकरात लवकर access द्यावा.
  2. सदर पोर्टलवर अर्जदारांची एकच ज्येष्ठता सूची राहील. सदर जेष्ठता सूचीनुसारच महाऊर्जा व महावितरण कंपनी यांनी अर्जदारांची सौर कृषी पंप वाटप करण्यासाठी निवड करावयाची आहे.
  3. त्यानुसार पोर्टलमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल तातडीने करण्यात यावेत.
  4. सौर कृषीपंप बसविण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप विक्री किंवा हस्तांतरण केल्यास त्यांच्या विरोधात महाऊर्जा किंवा महावितरणकडून कठोर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात येईल.

अनुदान तत्वावर सौर पॅनल घ्या ! आयुष्यभर मोफत वीज मिळवा

7 thoughts on “खुशखबर ! कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 2 लाख कृषी पंपांना मंजुरी, शासन निर्णय आला | Kusum Solar Yojana”

  1. What’s up everyone? I’m trying sky8866 out. The graphics are pretty impressive and they have a lot of different promotions running all the time. Looks great from my perspective: sky8866

  2. Bet888vina, what’s the deal? Honestly, I’ve seen better. They got the basics covered, I guess, but nothing really stood out to me. It’s alright, nothing special in my personal opinion. Check it out for yourself at: bet888vina

Leave a Comment