शासनामार्फत नागरिकांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इत्यादी विविध महाराष्ट्रातील घरकुल योजनांचा समावेश आहे.
वरील नमूद योजना व्यतिरिक्तसुद्धा आणखी एक घरकुल योजना राबविली जाते. ज्या योजनेचे नाव आहे शबरी घरकुल योजना. या योजने संदर्भातील संपूर्ण माहिती जशाप्रकारे शबरी घरकुल योजना काय आहे? योजनेचे उद्दिष्ट काय आहे ? पात्रता काय असेल, अर्ज कसा करावा व कागदपत्रे कोणती लागतील ? आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Shabari Gharkul Yojana 2023 Details
आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी म्हणजेच नागरिकांसाठी शासनामार्फत शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येते.
या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फूट.चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून दिलं जातं.
योजना नाव | शबरी आदिवासी घरकुल योजना |
विभाग | महाराष्ट्र राज्य आदिवासी विभाग |
लाभार्थी राज्य | महाराष्ट्र |
लाभ स्वरूप | घर बांधणीसाठी घरकुल अनुदान |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
शबरी घरकुल योजनेचा मुख्य उद्देश
शासनामार्फत सुरू करण्यात आलेला प्रत्येक योजनेचा एक मुख्य हेतू किंवा उद्देश असतो त्याचप्रमाणे शबरी घरकुल योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना कच्च्या मातीच्या किंवा झोपडीच्या घरातून बाहेर काढून पक्की अशी घरी उपलब्ध करून त्यांचे जीवनमान सुधारणे ही आहे.
शबरी घरकुल योजनेसाठी कागदपत्रं (Documents)
- अर्जदारांचा आधारकार्ड
- राशनकार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवाशी दाखला (Residence Certificate)
- मोबाइल क्रमांक
- मर्यादित उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- जमिनीचा ७/१२ व ८अ उतारा
- ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र
शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक पात्रता
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जात प्रवर्गातील असावा.
- लाभार्थी महाराष्ट्रात कमीत कमी 15 वर्ष वास्तव्यास म्हणजेच रहिवाशी असावा.
- अर्जदाराकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
- अर्जदाराकडे स्वतःचे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने पक्के घर नसावे.
- विधवा, परितक्ता, निराधार व दुर्गम भागातील अर्जदारांना प्राथमिकता म्हणजेच प्राधान्य देण्यात येईल.
- अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा क्षेत्रनिहाय खालीलप्रमाणे असावी.
- ग्रामीण क्षेत्र : 1.00 लाख रु.
- नगरपरिषद क्षेत्र : 1.50 लाख रु.
- महानगरपालिका क्षेत्र : 2.00 लाख रु.
Shabari Gharkul Yojana Application Form PDF
शबरी घरकुल आदिवासी योजनेसाठीचा फॉर्म PDF स्वरूपामध्ये तुम्हाला खालील लिंकवरती भेटून जाईल. तो अर्ज तुम्हाला डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून आवश्यक कागदपत्रासह खालील नमूद ठिकाणी दाखल करायचा आहे.
शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
खालील नमूद कार्यालयामध्ये तुम्ही शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- ग्रामपंचायत – ग्रामसेवक
- पंचायत – गटविकास अधिकारी
- जिल्हास्तर – आदिवासी प्रकल्प संचालक संबंधित अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
शबरी घरकुल योजना नेमकी काय आहे ?
आदिवासी समाजातील नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देणारी शासनाची एक महत्वकांशी योजना आहे.
शबरी घरकुल योजना कोणत्या समाजासाठी राबविली जाते ?
अनुसूचित जाती व जमातीच्या नारिकांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविली जाते.
शबरी घरकुल योजनेचा मुख्य उद्देश काय ?
आदिवासी समाजातील अतिशय गरीब नागरिकांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध व्हावा हा मुख्य उद्देश शबरी घरकुल योजनेचा आहे.
शबरी घरकुल योजनेसाठी अनुदान किती दिलं जात ?
शबरी घरकुल योजनेअंतर्गत क्षेत्रनिहाय लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाते. ज्यामध्ये ग्रामीण क्षेत्रासाठी 1.32 लाख रुपये नक्षलवादी व डोंगराळ भागासाठी 1.42 लाख रुपये तर नगरपरिषद व नगरपालिका क्षेत्रासाठी 1.50 ते 2 लाख रुपये अनुक्रमे अनुदान दिलं जात.
शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना वरील नमूद संबंधित कार्यालयामध्ये विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रासह अर्ज दाखल करावा लागतो.