Gharkul Yadi : घरकुल लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. घरकुल योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांकडून खूप दिवसापासून प्रतीक्षा केली जात होती की, आम्हाला घरकुल मिळेल का ? अशा सर्व प्रतीक्षा करत असलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून दिलासा देण्यात आलेला आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या सार्वजनिकरित्या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण एकूण किती जिल्ह्यातील लाभार्थ्यांची घरकुल यादी प्रसिद्ध झालेले आहे व कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला यासंदर्भातील थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
नवीन घरकुल यादी 2023-24
शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या घरकुल योजना राबविण्यात येतात. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना मुख्यत्व महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांसाठी राबविले जाते. संबंधित प्रवर्गातील नागरिकांना सदर घरकुल योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी घरकुल उपलब्ध करून देण्यात येतं.
चालू वर्षातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 व संदर्भ क्रमांक 2 ते 4 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती चंद्रपूर, लातूर, भंडारा, सातारा, रत्नागिरी, नागपूर, भंडारा आणि सांगली या जिल्ह्यातील घरकुल यादी प्रकाशित करण्यात आलेल्या असून यासाठीची मान्यता राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णयाद्वारे घेण्यात आलेली आहे.
खालील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरील नमूद 8 जिल्ह्यातील लाभार्थ्यांची घरकुल यादी पाहण्यास मिळेल. संबंधित शासन निर्णयामध्ये प्रति लाभार्थ्यांसाठी किती अनुदान दिलं जाणार आहे, यासंदर्भातीलसुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्या जिल्हानुसार यादीतील नावावर क्लिक करून संबंधित जिल्ह्याची घरकुल लाभार्थी यादी पाहू शकता.
👇👇👇👇👇👇👇👇
प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा