Ration Card News : महाराष्ट्रातील सर्व रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनामार्फत मागील वर्षापासून रेशन कार्डधारक नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याची नवीन संकल्पना अमलात आणली आहे, जर तुम्हीसुध्दा रेशन कार्डधारक नागरिक असाल, तर ही बातमी नक्कीच तुमच्या कामाची असणार आहे. मागील वर्षाप्रमाणे आता या वर्षीसुध्दा महाराष्ट्र शासनाकडून दिवाळीनिमित्त नागरिकांना बोनस दिले जाणार आहे.
आनंदाचा शिधा | Ration Card News
नागरिकांना दिवाळी, दसऱ्यानिमित्त दरवर्षी रेशनधान्य दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त रवा, साखर, तेल इत्यादी वस्तू देण्यात येतात, त्यासुद्धा अतिशय एकदम अल्पदरात. आता यावर्षीसुद्धा नागरिकांना रेशन धान्य दुकानांमध्ये फक्त शंभर रुपयात 06 वस्तू देण्यासाठी राज्यशासनाकडून 3 ऑक्टोबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय खूपच महत्त्वाचा असून याठिकाणी आपण त्यासंदर्भातील थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील राशन कार्डधारक नागरिकांसाठी दिवाळी व दसरा या सणांचा अवचित साधून खूपच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयांतर्गत आनंदाचा शिधा नागरिकांना, शेतकऱ्यांना फक्त 100 रुपयात वाटप केला जाईल. मागील वर्षी शिधा वाटपात फक्त चार वस्तूंचा समावेश करण्यात आलेला होता; परंतु आता यावर्षाने वाढी दोन वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे.
आनंदाचा शिधा मध्ये “या” वस्तूंचा समावेश
तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल यांचा समावेश होता मात्र, आता यामध्ये मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला आहे. आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येणार असल्याचं राज्य शासनाकडून सांगण्यात आला आहे.
💁 हे सुध्दा वाचा : राज्यात आता नागरिकांना ई-रेशनकार्डच मिळणार
शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील गोरगरीब नागरिकांना दिवाळी सणात खूपच फायदा होणार आहे. यामधील आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वाढीव मैदा व पोह्याचा समावेश शिधापत्रिकेत करण्यात आलेला आहे. शिधापत्रिकाधारकांसाठी ही बातमी खूपच आनंदाची आहे. नक्कीच ही माहिती तुम्ही इतरांना शेअर करा.