Zilla Parishad Yojana : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू झालेले आहेत. संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.
सदर योजना फक्त सध्यास्थितीत पुणे जिल्ह्यासाठी सुरू झालेली आहे. Zilla Parishad Yojana संपूर्ण माहिती, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता, अर्ज कुठे करावा अशी सविस्तर माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.
जिल्हा परिषद योजना 2025
जिल्हा परिषद निधीमधून जिल्ह्यातील शेतकर्यांना, गरजू महिलांना, दिव्यांग बांधवांना विविध आवश्यक वस्तूंचा वाटप केला जातो. ज्यामधे इलेक्ट्रिक मोटार, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे मशीन, PVC पाईप, प्लास्टिक ताडपत्री, सोलर वॉटर हीटर, शिलाई मशीन, पीठ गिरणी इत्यादीचा समावेश आहे.
यामधे शेतकर्यांना 50% अनुदान, जिल्हा परिषद निधीतील 5 टक्क्यातून 100% अनुदान, सोबतच मुलींना व महिलांना महिला व बालकल्याण विभागाकडून अनुदान दिला जातो.
जिल्हा परिषद उपलब्ध योजना
- कृषी विभाग योजना
- 5HP ओपनवेल विद्युत मोटरपंप संच
- प्लॅस्टिक ताडपत्री 6*6 मीटर
- 90 एम.एम PVC पाईप
- बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रे पंप
- समाजकल्याण विभाग योजना
- जि.प. 20% निधी योजनेंतर्गत 100% अनुदानावर साहित्यांचा लाभ घेणेसाठी योजना
- मागासवर्गीय व 5% दिव्यांग निधी 20% योजनेंतर्गत 100% अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ योजना
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- दिव्यांग कल्याण योजना
- अतित्तीव्र दिव्यांग (मतीमंद/बहुविकलांग/अंध/मुकबधीर) लाभार्थींना निर्वाह भत्ता देणेबाबतची वैयक्तिक योजना
- पशुसंवर्धन योजना
अशा विविध विभागाच्या योजनांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून लाभार्थींना मोबाईल वरून अर्ज करता येईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents)
- अर्जदारांचा आधारकार्ड
- बँक पासबूक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो (2)
- रहिवाशी प्रमाणपत्र
- लाइट बिल (संबंधित योजनेसाठी)
- उत्पन्न दाखला (संबंधित योजनेसाठी)
- 7/12, 8अ (संबंधित योजनेसाठी)
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- शिधापत्रिका झेरॉक्स
- अपंग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
पात्रता (Eligibility Criteria)
1) अर्जदार व्यक्ति महाराष्ट्रातील रहिवाशी असावा. 2) योजनेचा प्रकार आणि नियमाप्रमाणे उत्पन्न मर्यादा असावी. 3) महिला/शेतकऱ्यांसाठी/ दिव्यांगासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम जिल्हा परिषद योजनेच्या zppunecessyojana.com या वेबसाईटला भेट द्या.
- Menu पर्यायमधून अर्जदारवरती क्लिक केल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
- नोंदणी झाल्यानंतर अर्जदार लॉगीन पर्याय निवडून लॉग इन करा.
- आपल्या पात्रतेनुसार/आपण भरलेल्या माहितीच्या आधारे आपण पात्र असलेल्या योजना दाखवल्या जातील.
- ज्या योजनेचा अर्ज करायचा आहे ती योजना निवडा.
- संबधित माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा आणि अर्जाची स्थिती Applicant Login पर्यायमध्ये पहाता येईल.
👇👇👇👇👇👇