Crop Insurance : अतिवृष्टी व नुकसान भरपाई करण्यासाठी VK नंबर कुठून मिळवायचा ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शासनाकडून आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. सध्या स्थितीत संपूर्ण राज्यभरात नुकसान भरपाई व दुष्काळी वाटप सुरू असून राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार अनुदान मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक असलेला VK क्रमांक कुठून मिळवायचा या संदर्भातील थोडक्यात पण कामाची माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

VK Number KYC Maharashtra

अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून VK नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे, याच विशिष्ट क्रमांकाला VK नंबर अशी संज्ञा देण्यात आलेली आहे. व्हीके क्रमांक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना Online ई-केवायसी करावी लागेल, त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुष्काळी अनुदान किंवा अतिवृष्टी मदतीची रक्कम जमा करण्यात येईल.

VK नंबर ऑनलाईन मिळवण्यासाठी शासनाकडून कोणतीही वैयक्तिक वेबसाईट किंवा पोर्टल सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना VK क्रमांक मिळवण्यासाठी संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयात तलाठी यांना संपर्क साधावा लागेल किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन उपलब्ध यादी असेल, तर त्या यादीतून आपला विशिष्ट क्रमांक मिळवावा लागेल.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

तुमच्याकडे जर VK क्रमांक असेल आणि तुम्हाला दुष्काळी अनुदान किंवा नुकसान भरपाई मिळालेली आहे का ? याची ऑनलाईन स्थिती तपासावयाची असल्यास शासनाकडून नुकतीच एक नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. खाली देण्यात आलेल्या पोर्टल वर जाऊन त्या ठिकाणी तुमचा VK क्रमांक टाकून तुम्ही तुम्हाला मिळालेल्या अनुदानाची माहिती व इतर आवश्यक माहिती त्याठिकाणी पाहू शकता.

तुम्हाला दुष्काळी अनुदान मिळालं का ? येथे ऑनलाईन चेक करा

👇👇👇👇👇👇👇👇

Leave a Comment