Tata Power Solar Dealership : मित्रांनो, सध्याच्या घडीला देशातील अनेक युवक बेरोजगार आहेत. याचा अर्थ असा नाही की, प्रत्येक युवक आर्थिकदृष्ट्या प्रबळ किंवा सक्षम नाही. बहुतांश बेरोजगार युवकाकडे पैसा असतो म्हणजेच आर्थिक परिस्थिती चांगली असते; परंतु कोणता व्यवसाय करावा ? या विचारात तो युवक कोणत्याही व्यवसायकडे न बोलता बेरोजगार राहून जातो.
आज आपण अशाच एका व्यवसायाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या व्यवसायामध्ये युवकांना सुरुवातीला काही गुंतवणूक करून दरमहा लाख रुपयापर्यंत कमाई करता येते. तो व्यवसाय म्हणजे टाटा पावर सोलर डीलरशिपचा. या सोलर कंपनीची डीलरशिप घेऊन तुम्ही तुमच्या भागातील ग्राहकांना योग्य दरात विक्री केल्यास दरमहा तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.
टाटा सोलर एनर्जी डीलरशिप घेण्यासाठी येथे ऑनलाईन अर्ज करा
टाटा पॉवर सोलर डीलरशिप घेण्यासाठी अर्जदारांना आवश्यक लागणारी कागदपत्र
मित्रांनो, जर तुम्हाला टाटा पावर सोलर डीलरशिप घ्यावयाची असेल, तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता; परंतु यापूर्वी तुमच्याकडे खालील सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा आधारकार्ड
- पॅनकार्ड
- बँक पासबुक
- मागील सहा महिन्याचा बँक स्टेटमेंट
- पत्त्याचा पुरावा
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- पोलीस पडताळणी चारित्र्य प्रमाणपत्र
- रेशनकार्ड (आवश्यक असल्यास)
- मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे 05 फोटो
अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी वरील सर्व कागदपत्र जवळ बाळगावी जेणेकरून अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण अर्जदारांना येणार नाही.