Soil Health Card : शेतकरी मित्रांनो ! भरघोस उत्पन्न हवं आहे का ? मग माती परीक्षण नक्की करा आणि माती आरोग्य कारणासाठी असा अर्ज करा

Farmers do you want produce lot of products from farm, then test soil and apply for soil card read more benefits about soil testing

Soil Health Card | शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यामागील शासनाचा एकच मुख्य हेतू असतो, शेतकऱ्यांना शेतातून चांगलं उत्पन्न किंवा भरघोस उत्पन्न मिळविता यावं. शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न घेण्यासाठी काही आवश्यक बाबींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. याच संदर्भातील आपला आजचा महत्वपूर्ण लेख असणारा असून या लेखाच्या माध्यमातून आपण माती परीक्षण व सॉईल हेल्थ कार्ड यासंदर्भातील माहिती पाहणार आहोत.

माती परीक्षण म्हणजे काय ?

वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीची प्रत किंवा प्रकार वेगवेगळ्या असतो. यासाठी शेतकऱ्यांना माती परीक्षण करणं खूपच आवश्यक आहे. आता माती परीक्षण म्हणजे काय सर्वांनाच प्रश्न पडलेला असेल, तर माती परीक्षण ही काही वेगळी संकल्पना नसून यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील माती तपासण्यासाठी प्रयोगशाळेत घेऊन गेली जाते.

ज्या ठिकाणी शास्त्रज्ञ मातीचे परीक्षण करून त्यातील गुणदोषाची यादी तयार करतात. या यादीमध्ये मातीशी संबंधित माहिती आणि योग्य सल्ला दिला जातो. मृदा आरोग्य कार्ड अंतर्गत शेती करून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवता येतं. शिवाय जमिनीच्या मातीचा परीक्षण केल्यामुळे जमिनीचा समतोल ही शेतकऱ्यांना कायम राखता येतो.

मृदा कार्ड कसा मिळवावा ?

मृदा कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच soilhealth.dac.gov.in भेट द्यावी लागेल. त्यानंतर होमपेजवर आवश्यक अशी माहिती भरून लॉगिन केल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर राज्य निवडीचा पर्याय दाखवला जाईल. राज्य निवडून पहिल्यांदाच शेतकऱ्यांची सर्व मूलभूत माहिती त्याठिकाणी Register New User या पर्यायावर क्लिक करून भरावी लागेल. अर्जामध्ये संपूर्ण माहिती बरोबर टाकल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.

📣 13.60 लाख नागरिकांना घरकुल मंजूर, अशी डाऊनलोड करा घरकुलाची संपूर्ण यादी

अशा पद्धतीने शेतकरी मृदा कार्ड मिळवू शकतात. यासंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास शेतकरी बांधव हेल्पलाइन क्रमांक 011-24305591 आणि 011-24305948 वर संपर्क साधू शकतात. याशिवाय helpdesk-soil@gov.in या ईमेलवर ई-मेलसुद्धा पाठवता येईल.

मृदा कार्ड किंवा माती परीक्षणचे फायदे

शासनाच्या सदर मृदा परीक्षण माध्यमातून देशातील कोणताही शेतकरी आपल्या शेतातील मातीची चाचणी किंवा परीक्षण घेऊ शकतो. मृदा कार्डद्वारे शेतकऱ्यांना जमिनीत कोणत्या पोषक तत्वाची कमतरता आहे किंवा जमिनीतील मातीमध्ये काय बदल करावा लागेल? याची कल्पना भेटेल. त्याचप्रमाणे शेतातील पिकासाठी पाण्याचा किती प्रमाण वापराव? कोणते पीक घ्यावं? इत्यादी फायदासुद्धा होईल. कार्ड बनवल्यानंतर शेतकऱ्याला जमिनीचे आरोग्य, उत्पादन क्षमता, जमिनीतील ओलावा पातळी, दर्जा आणि जमिनीतील कमकुवतपणा सुधारणाच्या मार्गाची ही माहिती संबंधित विभागाकडून देण्यात येईल.

Leave a Comment