दुधाळ गाय, म्हैस गटवाटप योजना आता सर्वांसाठी सुरू; शासन निर्णय (GR) आला !

Gai Maish Vatap Yojana : राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह भागविता यावा, यासाठी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना विविध प्रवर्गातील लाभार्थी नागरिकांसाठी राबविली जाते. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. दारिद्ररेषेखालील व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा असणार आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहूयात.

अल्पभूधारक शेतकरी व दारिद्र-रेषेखालील लाभार्थी यांना सुध्दा लाभ

राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 02 दुधाळ देशी/02 संकरित गाई/02 म्हशीचा एक गट वाटप करण्यात येतो. या योजनेच्या लाभार्थी निवड निकषांमध्ये आता नव्याने दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

शासनाच्या या नवीन शासन निर्णयामुळे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना आता सदर योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. ज्याअंतर्गत 02 दुधाळ देशी/02 संकरित गाई/02 म्हशीचा एक गट वाटप केला जातो. या योजनेची येणारी पुढील अर्जप्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा शासन निर्णय लागू असेल.

निवडक्रम खालीलप्रमाणे असेल

  • दारिद्र रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक शेतकरी ( 1 हेक्टर पर्यंतचे शेतकरी)
  • अल्पभूधारक शेतकरी ( 1 हेक्टर पर्यंतचे शेतकरी)
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी असलेले)
  • महिला बचत गटातील लाभार्थी

शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा


नाविन्यपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

🔴 महत्वाची सूचना : सध्यास्थितीत सदर योजनेची अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे अर्जदार आता अर्ज करू शकणार नाहीत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आमच्यामार्फत ग्रुपच्या माध्यमातून त्यासंदर्भातील माहिती देण्यात येईल.

Leave a Comment