रोजगार हमी योजना महत्वपूर्ण अपडेट : आता रोजगार हमी योजनेसाठी eKYC करावी लागणार, नाहीतर यापुढे पैसे मिळणार नाहीत

खेड्यापाड्यातील गोरगरीब मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने शासनाकडून रोजगार हमी योजना (MNREGA) 02 फेब्रुवारी 2006 पासून संपूर्ण देशभरात राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना कामाच्या मोबदल्यात काही निश्चित उत्पन्न मिळत.

शासनाकडून आता या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे. यापुढे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना लाभ मिळवण्यासाठी eKYC म्हणजेच आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत नियमित पैसे मिळत असतील, तर तुमच्या जॉब कार्डसाठी त्वरित ई-केवायसी करून घ्या.

रोजगार हमी योजना – 100 दिवस रोजगार

रोजगार हमी योजना ही एक केंद्र सरकारची योजना असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना एका आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाते. अकुशल मजुरीचे काम करू इच्छिणाऱ्या 18 वर्षावरील या योजनेत सहभाग नोंदविता येईल.

सहभाग नोंदविलेल्या अकुशल मजुरांना कामाचा मोबदला म्हणून शासनाकडून ठरविण्यात आलेली निश्चित रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. संबंधित योजनेत भाग घेण्यासाठी अर्जदाराला जॉब कार्ड काढावं लागतं. त्यानंतर त्यांना खालीलप्रमाणे सार्वजनिक व वैयक्तिक कामे दिली जातात.

  • शासकीय रस्ता बांधणी
  • जलसंधारण आणि तलाव दुरुस्ती
  • सिंचन विहीर बांधकाम
  • वृक्षारोपण
  • घरकुल बांधकाम
  • फळबाग लागवड

वरील सर्व कामाच्या माध्यमातून नोंदणीकृत मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मजुरांच्या बँक खात्यामध्ये काम झाल्यानंतर पैसे जमा करण्यात येतात.

eKYC का महत्त्वाची ?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, रोजगार हमी योजना eKYC आवश्यक का आहे ? कारण बहुतांश कामगाराच्या नावावर रोजगार हमी योजनेचा जॉब कार्ड असतो; परंतु शासनाच्या नव्या नियमानुसार आता ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसेल, त्यांना कामाचे पैसे मिळणार नाहीत. eKYC का महत्त्वाची 👇

  • नोंदणीकृत कामगाराची खरी ओळख निश्चित करण्यासाठी
  • बोगस व बनावट कामगार नोंदणी रद्द करण्यासाठी
  • पैसे थेट लाभार्थी मजुरांच्या खात्यात जमा करण्यासाठी

eKYC कशी करावी ?

  • सर्वप्रथम तुमच्या गावातील ग्रामरोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा.
  • त्यांना तुमचा जॉब कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड झेरॉक्स द्या.
  • रोजगार सेवक तुमची ई-केवायसी नोंदणी करून घेतील.
  • ई-केवायसी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पूर्ववत तुमच्या कामावर परत सहभागी होऊ शकता.
  • त्यानंतर तुमच्या कामाचे पैसे थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यात शासनाकडून जमा केले जातील.

EKYC फायदा आणि नुकसान

फायदानुकसान
पारदर्शकता वाढणार बोगस लाभार्थ्यांना लाभ
थेट बँक खात्यात पैसे जमा जॉब कार्ड निष्क्रिय (Inactive) होण्याची शक्यता
बोगस लाभार्थ्यांना आळाकाम मिळाल्यानंतर सुद्धा पैसे जमा होणार नाहीत
शासनाला अचूक मजूर आकडेवारी मिळणारभविष्यात या योजनेचा लाभ घेता येणार नाही
प्रत्येक कुटुंबाला खात्रीशीर रोजगारपात्र कुटुंबालाच लाभ मिळेल का ?

रोजगार हमी योजना ही शासनाची फक्त एक योजना नसून रोजगाराचा मूलभूत पाया आहे. त्यामुळे तुमचा जॉब कार्ड सक्रिय ठेवा आणि केलेल्या कामाचे पैसे वेळेत मिळवा. यासाठी आजच तुमच्या गावातील रोजगार सेवकाकडे जाऊन ही eKYC करून घ्या.

eKYC करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ?

रोजगार हमी योजना eKYC ई-केवायसी करण्यासाठी अर्जदारांचा आधारकार्ड, जॉब कार्ड, बँक पासबुक किंवा खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक असलेल्या मोबाईलवरील पडताळणीसाठी OTP लागेल.

eKYC केल्यानंतर किती दिवसात पैसे जमा होतात ?

eKYC पूर्ण झाल्यानंतर तुमचा जॉब कार्ड Active होईल. त्यानंतर तुम्ही कामावर गेल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार 7 ते 14 दिवसांत थेट बँक खात्यात पैसे जमा होतील.

रोजगार हमी योजना eKYC कशी आणि कुठे करावी ?

eKYC करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांना भेटाव लागेल. त्यानंतर त्यांना आवश्यक ती कागदपत्र दिल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.